राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा सदस्यांची नावे जाहीर; 'यांना' मिळाली संधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2018
Total Views |


 


नवी दिल्ली : राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा सदस्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार असणारे तसेच समाज माध्यांवर सक्रीय राकेश सिन्हा यांच्यासह कामगार नेते राम शकल, मूर्तीकार रघुनाथ महापात्रा आणि प्रसिद्ध नृत्यांगना सोनल मानसिंह यांची नावे जाहीर करण्यात आली. या चारही जणांचे त्यांच्या क्षेत्रात मोठे योगदान असल्यानेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या चार जणांना राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती केल्याचे सांगण्यात येत आहे.

 

राष्ट्रपतीनियुक्त करत असलेल्या १२ पैकी सचिन तेंडुलकर, अनू आगा आणि अभिनेत्री रेखा सह चार जागा रिकाम्या झाल्या होत्या त्यांच्या जागेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या चार जणांची आज निवड केली. दरम्यान, अभिनेत्री रेखा आणि सचिन तेंडुलकर यांच्या राज्यसभेतील गैरहजेरीवरून बरीच चर्चा रंगली होती त्यामुळे खेळ आणि सिने क्षेत्रातून कोणाचीही निवड करण्यात आलेली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगवली जात आहे.

 

नवनियुक्त राज्यसभा खासदारांचा परिचय

 

राकेश सिन्हा

राकेश सिन्हा हे सुप्रसिद्ध लेखक असून ते संघाचे मीडिया आणि सोशल मीडिया प्रमुखही आहेत. त्यांनी संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचे आत्मचरित्रही लिहिले असून 'राजनीतिक पत्रकारिता' या लोकप्रिय पुस्तकाचे ते लेखक आहेत.

 

सोनल मानसिंह

सोनल मानसिंह या भारतातील प्रमुख शास्त्रीय नृत्यांगनांपैकी एक आहेत. त्या गेली ६ दशकांपासून भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्य सादर करतात. त्यांना याआधीच पद्म विभूषण, पद्म भूषण आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.

 

रघुनाथ महापात्रा

रघुनाथ महापात्रा हे ओडिशातील प्रसिद्ध मूर्तीकार आहेत. प्राचीन मूर्ती, स्मारके यांच्या संरक्षणासाठी त्यांचे महत्त्वाचे कार्य आहे. महापात्रा यांनाही पद्मश्री, पद्म भूषण आणि पद्म विभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.

 

राम शकल

राम शकल हे गेल्या चाळीस वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत असून दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण काम केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@