कल्याण-डोंबिवली भूकंपाने हादरले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2018
Total Views |


 

ठाणे : कल्याण-डोंबिवली परिसरात २.८ रिश्टर स्केल भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. रायगड जिल्ह्यात जमीनीखाली ५ किमी खोलीवर या भुकंपाचे केंद्र होते. कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळ्यासह कल्याणजवळील ग्रामीण भागातही हे हादरे बसल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे रात्री बराच वेळ नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.

 

शुक्रवारी रात्री ९.३१ वाजता कल्याण-डोंबिवली परिसरात अचानक हे धक्के जाणवल्यानंतर बरेचसे नागरिक घराबाहेर पडले होते. नेमके धक्के कशाचे आहेत याची माहिती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले होते. साधारणपणे ९ वाजून ३३ मिनिटांपर्यंत म्हणजेच सुमारे २ ते ३ मिनिटं हे हादरे जाणवले. तसेच हादऱ्यांमुळे काही जणांच्या घरातील भांडी पडल्याची माहिती नागरिकांनी दिली. दरम्यान, रात्री उशिराने हे भूकंपाचे धक्के असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून जाहीर करण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@