दरोडयाच्या तयारीतील 3 जण जेरबंंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2018
Total Views |

६५ हजारांचा मुद्देमाल जप्त


 
 
जळगाव, १४ जुलै :
शहरातील मेहरुण तलावाजवळ काही व्यक्ती दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन संागळे यांना मिळताच त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून पिस्तुल व ६५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह तीन जणांना ताब्यात घेतले. दोन जण मात्र फरार झाले.
 
 
मेहरुण तलावाजवळ काही व्यक्ती रिक्षामध्ये शस्त्रानिशी बसलेले असून ते दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती सचिन सांगळे यांना मिळाली होती. त्यांनी स्था.गु.शाखेचे निरीक्षक सुनिल कुराडे यांना माहिती देवून मार्गदर्शन केले. त्यानुसार स्था.गु.शाखेचे पो.ना. बापू पाटील, पो.हे.कॉ. राजेंद्र पाटील, पो.कॉ. विजय पाटील, स.फै. नुरुद्दीन शेख ,पो.ना. गफूर तडवी, मिलिंद सोनवणे, शेख युनुस शेख रसुल, सचिन महाजन, एमआयडीसी पो.स्टे.चे निरीक्षक अनिरुध्द अढाव, स.फौ.अतुल वंजारी, पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, पो.ना. सचिन मुंढे, विजय पाटील, मनोज सुरवाडे यांनी तेथे सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास रिक्षा क्र. एमएच १९ व्ही. ८८०५ वर छापा टाकला.
 
 
यात रिक्षातील पळून जाणारे ३ जण पकडले गेले तर २ जण पळून गेले. पकडण्यात आलेल्यात मोहन गोविंद लोहार (वय २१) रा. रेणुका नगर, जळगाव याच्याजवळून लाल रंगाची मिरची पावडरची पुडी, रवींद्र उर्फ बापू अशोक भोई (वय ३०) रा. रेणुका नगर, रामेश्वर कॉलनी याच्याजवळून १५ हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल मॅकझीनसह (५०० रुपये किंमतीचे), एक जिवंत काडतूस आणि तुषार राजेंद्र सुतार (वय १९) रा. लक्ष्मीनगर याच्याजवळून ३ फूट लांबीची लोखंडी टॉमी सापडली. रिक्षात सीटच्या मागील बाजूस ७ फूट दोरी मिळाली. यात रिक्षासह एकूण ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पळून गेलेल्या नरेंद्र मगरे रा. सम्राट कॉलनी व आबू भालेराव रा. कासमवाडी जळगाव यांचा शोध सुरू आले. पो.ना. बापू पाटील यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक अनिरुध्द अढाव करीत आहे.
@@AUTHORINFO_V1@@