मदर तेरेसांनी बेकायदेशीर कृत्य केली; तस्लिमा नसरीन यांचे गंभीर आरोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2018
Total Views |

 


नवी दिल्ली : वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन या पुन्हा एकदा चर्चेत आल्या असून मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या बेकायदेशीर कृत्यावर व मदर तेरेसांवर टीका केली आहे. मदर तेरेसा यांचा अमानुष, बेकायदा आणि रानटी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा गंभीर आरोप नसरीन यांनी ट्विटरवर केला आहे.

 

मिशनरीज ऑफ चॅरिटीमधून झालेल्या बेकायदेशीर मुलांच्या विक्रीमध्ये नवीन काय आहे? असा प्रश्न विचारत तेरेसा प्रसिद्ध होत्या म्हणून त्यांची पाठराखण न करण्याचाही सल्ला तस्लिमा नसरीन यांनी दिला आहे. नसरीन यांच्या या ट्विटमुळे आता नवीन वादाला तोंड फुटणार असून मिशनरीजच्या कामावरच त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.

 


 

काय आहे प्रकरण?

 

मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या कर्मचार्‍यांनी उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातील एका जोडप्याला एक लाख २० हजार रुपयांत १४ दिवसांचे मूल विकले. पण काही दिवसांनी चॅरिटीने विकलेले मूल पुन्हा आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने या जोडप्याने रांचीच्या बाल कल्याण समितीकडे मदर तेरेसांच्या संस्थेविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर अनिमा इंदवार या ननला अटक करण्यात आली. ती मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या निर्मल हृदय संस्थेत काम करते. चॅरिटीतर्फे अविवाहित मातासांठी आश्रय गृह चालवले जाते. या आश्रय गृहातील एका महिलेच्या पोटी जन्माला आलेले मूल विकल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणी दोन सिस्टरसह एक जण ताब्यात असून त्यांची चौकशी चालू आहे.

@@AUTHORINFO_V1@@