गिरीश महाजन, खा.हरीशचंद्र चव्हाणांचा शिवसेनेला मास्टर स्ट्रोक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2018
Total Views |


 

दिंडोरीच्या नगराध्यक्षांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भाजपत प्रवेश


नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदार संघातील दिंडोरी नगरपंचायत नगराध्यक्ष प्रमोद देशमुख यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार हरीश्चंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून दिंडोरी नगरपंचायत भाजपच्या अधिपत्याखाली आली असून पालकमंत्री-खासदारांच्या जोडगोळीने एकाच दगडात अनेकांचा वेध घेतल्याने जिल्हा भाजपमध्ये उत्साह संचारला आहे.

 

नाशिकच्या गोल्फक्लब विश्रामगृहावर झालेल्या प्रवेश सोहळ्यात काँग्रेसच्या दिंडोरी नगरपंचायत उपाध्यक्षा उषाताई कराटे यांचाही भाजपत पक्ष प्रवेश करून काँग्रेसला धक्का दिला आहे. याबरोबरच अपक्ष नगरसेवक तथा नियोजन सभापती तुषार वाघमारे, नगरसेवक निलेश गायकवाड, नगरसेविका निर्मलाताई जाधव, बालकल्याण सभापती सविता देशमुख, आरोग्य सभापती रोहिणी पगारे यांनीही भाजपत प्रवेश करून पालकमंत्री गिरीश महाजन, खा. हरीश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. प्रवेश सोहळ्याप्रसंगी भाजप दिंडोरी तालुका अध्यक्ष संजय कावळे, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत राजे, शिवाजीबाबा पिंगळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष समीर चव्हाण, श्यामराव बोडके, शहराध्यक्ष श्याम मुरकुटे, मंदाकिनी पारक, कादवा साखर कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय जाधव, संतोष देशमुख, भास्कर कराटे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@