कुटूंब अर्थसहाय्य योजनेतील ३१ लाभार्थ्यांना ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते धनादेश वाटप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2018
Total Views |
शिंदखेडा, १४ जुलै :
शिंदखेड़ा येथे बिजासनी मंगल कार्यालयात कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील ३१ लाभार्थ्यांना ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते प्रत्येकी २० हजार रुपयाचा धनादेश वितरित करण्यात आला.
 
 
यावेळी तहसीलदार सुदाम महाजन, संजय ग़ांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष डी. एस. गिरासे, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, शिंदखेडा नगर पंचयतीचे नगराध्यक्षा रजनी वानखेडे, उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, गटनेते अनिल वानखेड़े, भाजयूमोचे जिल्हाध्यक्ष राम भदाने, पं.स. सदस्य दरबारसिग गिरासे आदी उपस्थित होते.
 
 
दारिद्रय रेषेखालील वयाच्या १८ ते ६० वर्षे आतील कुटुंब प्रमुखाचा आकस्मित रित्या मृत्यु झाल्यास अशा कुटुंब प्रमुखाच्या विधवा पत्नीस २० हजाराचा लाभ देण्यात येतो. या आर्थिक वर्षात ३१ महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. त्यात भूरीबाई भील, शिदखेड़ा, मंगलाबाई सोनवणे डाबली, कल्पना पाटील रामी, उषाबाई गिरासे टेमलाय, गिरिजाबाई मालचे, चावळदे, भीमाबाई माली मंदाने, लीलाबाई कोळी दभाषी, रत्नाबाई लोहार चिमठाणे, मनिषाबाई ठाकरे अजंदे, सुनंदा माळी, बेटावद, रानुबाई भील, कंचनपूर, भावना पाटील रोहाने, नाज़ुकबाई ठाकरे तावखेड़ा प्र न, आक्काबाई बोरसे घुसरे, लालीबाई पावरा, आशाबाई पाटील, दोंडाईचा, आशाबाई गिरासे, चिमठाणे, राजश्री येळवे, वालखेडा, इंदुबाई मालचे वालखेडा, ज्योतीबाई भिल, चिलाणे, रंजनाबाई भिल, शिंदखेडा, वनाबाई भिल, मांडळ, लक्ष्मीबाई भिल, ललिताबाई माळी, बालुबाई गिरासे, शिंदखेडा, मीनाक्षी वाघ, मीराबाई पाटील, सीमा कोळी, साधना ठाकूर दोंडाईचा, मंजुबाई भिल, पिंपरी, सुवर्णा पाटील, कलमाडी या लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आला. धनादेश वितरणाकामी तहसील कार्यालयाचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.
@@AUTHORINFO_V1@@