काँग्रेस फक्त मुस्लिम पुरुषांसाठी, महिलांचे काय :पंतप्रधान मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2018
Total Views |



341 किमीच्या पूर्वांचल एक्स्प्रेस वेचे भूमिपूजन


आझमगड : मुस्लिम महिलांसाठी अन्यायकारक ठरणाऱ्या तिहेरी तलाबद्दलच्या काँग्रेसच्या भूमिकेवर सडकून टीका करताना काँग्रेस पक्ष फक्त मुस्लिम पुरुषांसाठी आहे का? असा रोखठोक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. उत्तर प्रदेशच्या आझमगड येथे शनिवारी ३४१ किलोमीटरच्या पूर्वांचल एक्सप्रेस वे चे भूमिपूजन केल्यानंतर एका सभेत बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांवर टीकेचे आसूड ओढले. “विरोधक संसदेचे कामकाज बंद पाडण्याबरोबर तिहेरी तलाकसारख्या महत्वाच्या विधेयकांचा मार्गही रोखून धरतात,” असा आरोप मोदींनी यावेळी केला.

 

काँग्रेस पक्ष मुस्लिमांचा आहे, असे काँग्रेसाध्यक्षांनी म्हटल्याचे मी वर्तमानपत्रात वाचले. मला त्याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही, मला फक्त प्रश्न हा विचारायचा आहे की, काँग्रेस पक्ष फक्त मुस्लिम पुरुषांसाठीच आहे का? स्त्रियांचे काय?,” असा परखड सवाल करत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी यांना टोला लगावला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर काँग्रेसची जी भूमिका होती त्यातून त्यांचा खरा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. केंद्र सरकार महिलांचे आयुष्य सुखकर व्हावे यासाठी झटत आहे तर दुसरीकडे काँग्रेस आणि अन्य पक्ष एकत्र येऊन महिलांचे विशेषतः मुस्लिम महिलांचे आयुष्य अंधकारमय करत आहेत,” असा हल्लाही त्यांनी केला.

 

मोदी पुढे म्हणाले की, “कित्येत मुस्लीम देशांनी तिहेरी तलाक आणि निकाह हलाला या प्रथा बंद केल्या आहेत, मात्र काँग्रेससह विरोधकांनी या प्रथा कायम राहव्यात अशीच भूमिका घेतली. जे राजकीय नेते मला पंतप्रधानपदावरुन बाजूला करण्यासाठी एकत्र येत आहेत त्यांनी हलाला आणि तिहेरी तलाकमुळे नुकसान झालेल्या महिलांना भेटून संसदेत या विधेयकावर चर्चा करायला हवे. या पक्षांनी कितीही अडथळे आणले तरी हे विधेयक संसदेत संमत होईल असे आश्वासन मी मुस्लीम महिलांना देतो,” असे त्यांनी यावेळेस सांगितले. दरम्यान, काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर देताना ते देशवासियांबरोबर खोट बोलत असल्याचा आरोप केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील जनतेबरोबर खोटे बोलत आहेत. ते असुरक्षित झाले आहेत. मोदीजी तुम्हाला कसली भिती वाटते?,” असे ट्विट काँग्रेसने केले आहे.

 

पूर्वांचल एक्स्प्रेस वेची वैशिष्ट्ये

 

* ३४१ किमीचा देशातला सर्वात लांब एक्स्प्रेस वे असेल

 

* लखनौ ते गाजीपूरदरम्यान तयार होणार एक्स्प्रेस वे

 

* पदरी एक्स्प्रेस वे; पुढे लेनपर्यंत वाढवता येणार

 

* पूर्णपणे नियंत्रित एक्स्प्रेस वे असणार

 

* जवळपास १७ हजार कोटींचा खर्च

 

* वर्ष महिन्यांत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य

 

गेल्या काळातील सरकारांच्या उपेक्षेमुळे पूर्वांचल नेहमीच विकासापासून लांब राहिला मात्र, हा एक्स्प्रेस वे पूर्वांचलची जीवनवाहिनी बनेल. पूर्वांचलला विकासाशी जोडण्यासाठी आणि इथून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी हा एक्स्प्रेस वे उपयोगी पडेल. जगभरात भारताची ओळख आज प्रगतीशील अर्थव्यवस्थेच्या रुपात होत आहे, त्यात हा एक्स्प्रेस वे महत्त्वाची भूमिका निभावेल. मात्र आज काही लोक या एक्स्प्रेस वेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अशा लोकांनी आपल्या सत्ताकाळात फक्त भ्रष्टाचाराला मोकळीक दिली, हेच सत्य आहे.शिवाय ज्या लोकांनी एकेकाळी उत्तर प्रदेशला दंगल- आणि गुंड-पुंड दिले ते आज विकासाचे नाव घेत आहेत, जे हास्यास्पद आहे.

@@AUTHORINFO_V1@@