अमित शहांच्या विधानाचा विपर्यास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2018
Total Views |


 


हैद्राबाद : अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या राम मंदिराबाबत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी अखेर मौन सोडले. अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे काम २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी हैदराबादमध्ये भाजप नेत्यांसोबत अमित शाह यांची एक बैठक झाली त्यावेळी त्यांनी हे सूतोवाच केल्याची माहिती आहे.

 

या बैठकीचा वृत्तांत पत्रकारांना देत असताना भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य पी शेखरन यांनी शाह यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला. निवडणुका जाहीर होण्याआधीच राम मंदिर निर्मितीच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलली जातील. तसेच वेळेआधी निवडणुका घेण्याचा सध्या आमचा काहीही विचार नसल्याचे अमित शाह यांनी स्पष्ट केल्याचे शेखरन यांनी सांगितले.

 

दरम्यान, अमित शहा यांच्या या वक्तव्याने देशभर चर्चा रंगायला सुरुवात झाली असली तरी, भाजपने याविषयी खुलासा करताना म्हटले आहे कि, शहा यांच्या विधानाचा विपर्यास केला जात आहे. मात्र, या निम्मिताने पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा ऐरणीवर आला असून राम भक्तांच्या राम मंदिराविषयीच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

@@AUTHORINFO_V1@@