जळगावात ४५ हजारांचे हुक्का पार्लरचे साहित्य जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2018
Total Views |
 
 
जळगाव, १४ जुलै :
शहरात महानगर पालिकेच्या निवडणुकीची लगबग असतांना युनिटी चेंबर येथुन हुक्का पार्लरचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.
 
 
परिक्षाविधीन पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील यांना मिळालेल्या माहितीवरुन शहरातील युनिटी चेंबर, गणेश कॉलनी रोड येथे दुकान नं. १९ मध्ये हमतुम शॉपी या नावाच्या दुकानात कारवाई करण्यात आली. यात राजेश वसंतराव लोणे (वय ३८) रा.आशाबाबानगर याच्या मालकिच्या दुकानाची झडती घेतली असता १५ हजार १७० रुपये किमतीचे हुक्का पार्लर किट तसेच आणि साहित्य मिळून आले. तसेच बद्री विशाल सेल्स नावाच्या दुकानात २४ हजार ३०० रुपये किमतीचे हुक्का पार्लरचे किट मिळून आले. दुकानाचे मालक विशाल कैलास शेळके याच्यावर कारवाई करण्यात आली.
 
 
जे.के पान शॉप गोविंद रिक्षा स्टॉपजवळही कारवाई करण्यात येवून ६ हजार ४०० रुपये किमतीचे हुक्का पार्लर किट जप्त करण्यात आले. दुकानाचे मालक चंद्रकंात कैलास शेळके यांच्यावर कारवाई करण्यात आली. या तीनही कारवाईत ४५ हजार ८७० रुपये किमतीचे हुक्का पार्लर किट जप्त करण्यात आले. याबाबत शहर पोलीस ठाणे आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली. यात पो.उपनिरीक्षक सुर्यवंशी, चंद्रकंात कोसे, पोहेकॉ. नरवाडे, पो.ना. बागुल, क्युआरटी पथकाचे कर्मचारी सहभागी होते.
@@AUTHORINFO_V1@@