कोल्हापुरात पंचगंगेसह सर्व नद्यांना पूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |





कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर आले आहेत. पंचगंगा नदी देखील धोक्याच्या पातळी ओलांडण्याच्या स्थितीमध्ये आली असून जिल्ह्यातील ३० हून अधिक बंधारे देखील पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आला आहे.



गेल्या बुधवारपासून कोकण, सिधुदुर्गसह कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिह्यातील नद्यांच्या पाणीपातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्या आणि बंधारे हे तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पुराचे पाणी पात्राबाहेर पडण्यास देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गावांमध्ये आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.


दरम्यान पंचगंगेच्या पाणीसाठ्यात सध्या सर्वात वेगाने वाढ होत आहे. राधानगरी धरणक्षेत्रात देखील दमदार पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या दोन दिवसात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे काल धरणामधून १६०० क्युसेक पाण्याचा देखील विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

कोल्हापुरातील दत्त मंदिरात ही शिरले पाणी

कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर असलेल्या नरसोबाची वाडी येथे प्रसिद्ध दत्त मंदिरात देखील पुराचे पाणी शिरले आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे याठिकाणी देखील नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. त्यामुळे नदीचे पाणी थेट मंदिरामध्ये प्रवेश करू लागले आहे. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील पाऊले उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@