राम सातपुते यांची जितेंद्र आव्हाडांना ‘आगळी’ भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |

 
 
पुणे : श्रीमद् भगवद्गीता मुखोद्गत असल्याचा दावा करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांची काल झालेली फजिती कमी होती म्हणून की काय पण भाजप युवा मोर्च्याचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राम सातपुते यांनी आज चक्क आव्हाड यांना भगवद्गीता भेट म्हणून पाठवली आहे. आव्हाड यांची भगवदगीता तोंडपाठ आहे की नाही, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक परंतु काल त्यांनी जो चुकीचा श्लोक पत्रकारांसमोर सादर केला, तो त्यांनी नीट पाठांतर करुन पुन्हा एकदा सादर करावा यासाठी मी त्यांना आज "भगवदगीता" या ग्रंथाची एक प्रत पोस्टाने पाठवत आहे असे सातपुते यावेळी म्हणाले.
 
 
 
काय आहे प्रकरण -


विधिमंडळाच्या नागपूर येथील पावसाळी अधिवेशनादरम्यान काल शाळांमध्ये भगवद्गीता वाटण्याच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला. गीता वाटण्याला विरोध दर्शवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपल्याला गीता मुखोद्गत असल्याचा दावा केला. एका पत्रकाराने त्यांना त्यातील काही श्लोक म्हणून दाखवा म्हटल्यानंतर त्यांनी प्रथम त्या पत्रकारालाच तुम्ही भाजपचे प्रवक्ते म्हणून आलात का हा प्रश्न विचारत त्याची खिल्ली उडवली व नंतर मूर्खासारखे प्रश्न विचारू नका असे म्हणत थेट त्याचा अपमान केला. त्यानंतर त्यांनी उसने अवसान आणून गीतेतील एक श्लोक म्हणून दाखवण्याचा प्रयत्नही केला मात्र ऐन वेळी तो नीट न आठवल्यामुळे त्यांची चांगलीच फजिती झाली.
 

 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळाच्या आवारात एका पत्रकाराचा सार्वजनिक ठिकाणी असभ्यपणे अपमान केला. सोयीप्रमाणे दिवसरात्र संविधानाचे दाखले देणाऱ्या आव्हाडांनी त्या पत्रकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला असून याचा मी जाहीर निषेध करतो असे सातपुते यांनी यावेळी सांगितले. मला आशा आहे की आव्हाड हे मी पाठवलेल्या भगवदगीतेच्या प्रतीचे नीट अध्ययन करुन पुढच्यावेळी त्याचे सादरीकरण करताना चूक करणार नाहीत असे म्हणत त्यांनी आव्हाड यांना एक टोला हाणला.
 
@@AUTHORINFO_V1@@