अनंतनाग येथे चकमकीत दोन जवान शहीद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |


 
 
अनंतनाग : जम्मू काश्मीर येथे सुरु असलेल्या चकमकी थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. आज जम्मू काश्मरीच्या अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
अनंतनाग जिल्ह्यातील शीरपोरामध्ये ही घटना घडली. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफच्या दोन जवान शहीद झाले. दरम्यान गेल्या महीन्यात देखील कुपवाडा येथे दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. दिवसेंदिवस या हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे.  
 
सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान जखमी झाले होते. या जवानांना उपचारासाठी तेथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या दोघा जवानांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी जवळपास दहा मिनिटे गोळीबार केला.
@@AUTHORINFO_V1@@