कॉंग्रेसच्या कोणत्या नेत्याने किती उमेदवार दिले?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |
जळगाव :
महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष मोठ्या उत्साहाने उतरला आहे. प्रत्येक पदाधिकार्‍याने एक उमेदवार दत्तक घ्यावा आणि त्याला निवडून आणावे, असे आवाहन आ. अब्दुल सत्तार यांनी केले होते. प्रत्यक्षात जिल्ह्यातील कोणत्या नेत्यांनी किती उमेदवार दिले, असा प्रश्‍न पक्षाच्या ज्येष्ठ सदस्याने ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला.
 
 
जातीय समीकरण जुळवल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही. जळगाव महापालिका मतदारसंघात लेवा पाटील, मराठा पाटील समाजाचे मताधिक्क्य आहे. ही बाब जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना माहित नाही काय? त्यांनी लेवा पाटील व मराठा पाटील समाजाचे किती उमेदवार स्वत:हून दिले, कॉंग्रेसची यादी पाहिली असता त्यातील किती उमेदवार निवडून येतील असा प्रश्‍न ज्येष्ठ सदस्याने उपस्थित केला आहे. आ.अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आणण्याची गर्जना केली होती. पण तेही कुठे दिसत नाहीत. निदान प्रचाराला तरी येणार आहेत का? असा प्रश्‍न या कार्यकर्त्याने केला आहे. आघाडीच्या उमेदवारांची यादी भली मोठी असली, तरी त्यात १०० टक्के कॉंग्रेसी किती? असा प्रश्‍नही कार्यकर्त्याने ‘तरुण भारत’शी बोलताना केला. पक्ष उभा करण्यात हयात घालविली आणि त्याच पक्षाची जळगाव शहरातील दारुण अवस्था बघवत नसल्याचेही या कार्यकर्त्याने सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@