लिपीकवर्गीय कर्मचार्‍यांसाठी १ ऑगस्टपासून प्रशिक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |
जळगावः
विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत लिपीकवर्गीय कर्मचा-यांसाठी १ ऑगस्ट ते ९ ऑक्टोबर, २०१८ या कालावधीत महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लक्ष्मण पाटील, सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी दिली आहे.
 
या प्रशिक्षणासाठी ७ मोड्युलप्रमाणे निश्चित केलेला तपशीलवार अभ्यासक्रम कोषागार अधिकारी, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार यांच्या जिल्हा कोषागार कार्यालयात माहितीसाठी उपलब्ध आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी कोणत्याही इच्छुक कर्मचार्‍यास प्रवेश देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण शासकीय कर्मचारी व नवनियुक्त कर्मचारी यांना सक्तीचे केले आहे. प्रशिक्षणासाठी संपूर्ण ५० दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आवश्यक आहे. तथापी, पूर्णवेळ प्रशिक्षणास पाठविणे शक्य नसल्यास विशिष्ट मोड्युलसाठी प्रवेश घेण्याची अनुमती कर्मचार्‍यांना दिली जाणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@