थर्माकोल बंदी कायम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |



मुंबई : प्लास्टिकप्रमाणेच पर्यावरणदृष्ट्या गंभीर प्रश्न उभ्या करणार्या थर्माकोलवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. यामुळे थर्माकोलच्या अनेक वस्तू, गणपतीसाठी मखर आणि इतर सजावट साहित्यांवरील बंदी कायम राहणार आहे

.

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी प्लास्टिक तसेच थर्माकोलवर तसेच त्यापासून बनवलेल्या सर्व प्रकारच्या वस्तूंवर बंदी घातली होती. महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा गणेशोत्सव काही महिन्यांवर आला असून गणेशोत्सव काळात मखरे आणि सजावट साहित्यात थर्माकोल प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या साहित्याची निर्मिती आधीपासूनच सुरू होते. त्यामुळे, थर्माकोलबंदीमुळे हे सजावट साहित्य विकणार्यांचे मोठे नुकसान होईल, अनेक मराठी तरुणांनी ही मखरे तयार केली असून त्यांना मोठा फटका बसेल. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवासाठी थर्माकोल वापरण्याची मुभा द्यावी, अशी याचिका असोसिएशनतर्फे मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. असोसिएशनतर्फे ॅड. मिलिंद परब यांनी या साहित्य निर्मात्यांचे तसेच विक्रेत्यांचे मोठे नुकसान होईल, असा युक्तिवाद केला होता. मात्र, शुक्रवारी न्यायालयात या याचिकेवर न्या. अभय ओक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत ही याचिका फेटाळून लावण्यात आली.

 

थर्माकोलबंदीवर ठाम राहत पर्यावरणाला हानिकारक गोष्टींना परवीनगी देता येणार नाही,” असे स्पष्ट मत उच्च न्यायालयाने यावेळी व्यक्त केले. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करत असताना बाप्पाच्या सजावटीसाठी आपण थर्माकोल तर वापरत नाही ना, याची डोळ्यात तेल घालून खबरदारी आता सर्वच गणेशभक्तांना घ्यावी लागणार आहे. तसेच, दैनंदिन वापरातही थर्माकोल वापरला जात नाही ना, हेही सर्वांना काळजीपूर्वक पाहावे लागणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@