चाळीसगावला तरुणावर ३ गोळ्या झाडल्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |

गुन्हेगारीला ऊत, खाजगी सावकारी सुरुच, गावठी कट्ट्याचा वापर

 
 
चाळीसगाव :
शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे चित्र आहे. ११ रोजी सावकारीच्या पैशांच्या वादातून एकावर गावठी कट्यातून ३ गोळ्या झाडत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना नागद रोडवरील राकेश वाईन शॉपसमोर बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.
 
 
जखमीवर येथील देवरे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आवर घातला नाही तर शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
 
 
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील रहिवासी कृष्णा अविनाश जाधव (२४) या तरुणास सावकारीच्या पैशांच्या वादावरुन आरोपी संभा देशमुख रा.वैतागवाडी चाळीसगाव याने गावठी (बंदूक) कट्ट्यातून ३ गोळ्या छातीवर उजव्या बाजूला व पाठीवर आणि बरगडीवर झाडून गंभीर जखमी केले आणि पळ काढला. जखमी कृष्णा जाधव याला देवरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शरीरात तीन गोळ्या घुसल्या एक बरगडी जवळील गोळी काढण्यात आली असली तरी उर्वरीत २ गोळ्या काढण्यासाठी डॉक्टरांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला आरोपी संभा देशमुख याच्या विरोधात कृष्णा जाधव याच्या जबाबावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
डीवायएसपी नजीर शेख यांना गोळीबाराने सलामी
चाळीसगाव उपविभागीय अधिकारी अरविंद पाटील यांची नुकतीच बदली झाली असून त्यांच्या जागी नजीर शेख नव्याने रूजू झाले आहेत चाळीसगाव शहराची एकात्मता व बंधुभाव तसेच हिंदू मुस्लिम समाजातील भाईचारा राज्यात लौकिकास पात्र आहे. मात्र टवाळखोर तरुणांच्या लहान लहान गुन्हेगारी टोळ्या परिसरात डोके वर काढत असून त्याचा परिणाम या घटनेत दिसून येतो आहे ही नव्याने रुजू झालेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांना गुन्हेगारांची सलामी असल्याची चर्चा होत आहे. हस्तक्षेप सहन न करता कायद्याचा धाक निर्माण होईल, अशी धडक कारवाई करावी व बेकायदा सावकारी व गुन्हेगारांचे कंबरडे मोडावे, अशी शांतताप्रेमी आणि जनतेची अपेक्षा आहे.
@@AUTHORINFO_V1@@