मुंबईतील कोळीवाड्यांच्या सीमा निश्चित करण्याचा निर्णय सहा महिन्यांमध्ये घेणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |


 

मुंबई :मुंबईतील कोळीवाडे, गावठाण आणि आदिवासी पाडे यांच्या सीमा निश्चित करण्याबाबत आणि पुनर्विकासासंबंधी सहा महिन्यात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली. सदस्य किरण पावसकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मुंबई शहर मुंबई उपनगरातील कोळीवाड्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करुन सीमांकन करण्याची कार्यपद्धती आणि त्यासंबंधीची मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी २० नोव्हेंबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार समिती गठीत करण्यात आली. या समितीने २०१५ -१७ च्या दरम्यान, त्या जागेवर जाऊन काही कोळीवाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करुन स्थळपाहणीचा अहवाल दि. मे २०१६ जानेवारी २०१८ मध्ये शासनास सादर केला. त्याच अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाडे पात्र अतिक्रमणदारांचे पुनर्वसन करण्याबाबतचा प्रस्ताव संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक आणि संचालक यांनी शासनास सादर केला आहे. या पुनर्वसनाच्या प्रस्तावाची कार्यवाही करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला पाठवण्यात आल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@