केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची अनुसूचित जातीच्या विविध विषयांवर उपराष्ट्रपतींशी चर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |
 
 
 
नवी दिल्ली :  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अनुसूचित जातींच्या विविध विषयांवर उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
 
उपराष्ट्रपती यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत आठवले यांनी ॲट्रोसिटी, पदोन्नतीमधील आरक्षण, अनुसूचित जाती, जमातीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती या विषयांवर चर्चा केली. तसेच याबाबतचे निवेदनही उपराष्ट्रपती यांना सादर केले.
 
१८  जुलैपासून होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये ॲट्रोसिटी कायदा, अनुसूचित जाती, जमातीतील पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे हे विषय संसदेच्या पटलावर यावे, अशी विनंती केली. यासह अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा शिष्यवृत्ती देण्यात यावी. तसेच देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे वाढ करण्यात यावी, अशी विनंती  आठवले यांनी उपराष्ट्रपती नायडू यांच्याकडे केली. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@