निफ्टी पुन्हा ११ हजार बिंदूवर, सेन्सेक्स विक्रमी उंचीवर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |

निफ्टीने प्रथमच गाठली ११ हजार बिंदूंची पातळी
सेन्सेक्सनेही केला ३६ हजार ६९९ बिंदूंचा सार्वकालिक उच्चांक गाठला.

 
 
ऑटो, टायर क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढीची दाट शक्यता.
फास्ट फूड कंपन्या अन्न पदार्थातील साखर, मीठा चे प्रमाण कमी करणार!
येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाआधीच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) नव्या उच्चांकी विक्रमाचा झेंडा फडकवणार असल्याचे भाकित तज्ञांनी केले असल्याचे याच स्तंभात कालच म्हटल्यानुसार आज गुरुवारी १२ जुलै रोजी निफ्टीने फेबु्रवारीपासून प्रथमच ११ हजार बिंदूंची पातळी पुन्हा गाठली असून मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स)नेही ३६ हजार ६९९ बिंदूंची सार्वकालिक विक्रमी उच्चांकी(ऑल टाईम हाय) मजल गाठली आहे! याबरोबरच तज्ञांच्या अचूक अंदाजाची प्रचितीही आली.
आज सकाळी ९ वाजून १ मिनिटांनी व्यवहारपूर्व सत्रात सेन्सेक्स ३६ हजार ३४१ बिंदूंवर तर निफ्टी ११ हजार ३४ बिंदूंवर राहिलेला होता. बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स ३६ हजार ४२४ बिंदूंवर तर नंतर तो बरोबर दुपारी १२ वाजेच्या सुमारात ३६ हजार ६९९ बिंदूंच्या सार्वकालिक उच्चांकापर्यंत आलेला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) या तेल शुद्धीकरण व दूरसंचार क्षेेत्रातील बड्या कंपनीचा शेअरही लागोपाठ पाचव्या दिवशीही तेजीतच राहिल्याने टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस या माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनीप्रमाणे आरआयएलही आता १०० अब्ज बाजार भांडवल असलेली दुसरी कंपनी बनली आहे. आरआयएलच्या आजच्या या २.५ टक्के वाढीमुळे त्याचा शेअर १०६२ रुपये अशा विक्रमी उंचीवर आला असून गेल्या पाच दिवसात तो तब्बल दहा टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे शेअर बाजाराची मानसिकता (सेंटिमेंट्स) सकारात्मक होऊन त्यानेही १० हजार ७०० बिंदूंच्या जवळपासची विक्रमी पातळी गाठली आहे. याचे कारण म्हणजे त्याच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जाहीर करण्यात आलेली दूरसंचार क्षेत्रविषयक (‘रिलायन्स जिओ’सह) आक्रमक योजना होय. त्यामुळे नवे युगही निर्माण होणार आहे.
 
या तेजीमुळे पाचशेपेक्षाही जास्त कंपन्यांचे शेअर्स वाढले असून दीडशेपेक्षाही कमी कंपन्यांचे शेअर्स घटले. तर जेमतेम पन्नासपेक्षाही कमी कंपन्यांचे शेअर्स मात्र किंमतीत कुठलाही बदल न होता ‘जैसे थे’च राहिले होते.
 
स्वयंचलित वाहन (ऑटो) क्षेत्रातील तेजीमुळे अर्थव्यवस्थे च्या दृष्टिने चांगले संकेत मिळत आहेत. ऑटो सेक्टरमध्ये बजाज ऑटोवर भर देता येईल. सध्याच्या स्तरावरुन बजाज ऑटोमध्ये १८ ते २० टक्के तेजी दिसून येणार आहे. याबरोबरच महिंद्रा आणि महिंद्रावरही लक्ष केंद्रित करता येईल. तसेच ऑटोशी संबंधित क्षेत्रांवरही नजर ठेवता येणे शक्य आहे. विशेषत: टायर सेक्टरमधील जे. के. टायर चांगले दिसत आहे.
 
आज सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास बाजार उघडल्या उघडल्याच एचसीएल टेक्नॉलॉजीसचा या आयटी क्षेत्रातील कंपनीचा शेअर हजार रुपयांची मानसशास्त्रीय पातळी (सायकॉलॉजिकल लेव्हल) ओलांडीत १००९ रुपयांवर आला होता. तो कालच्या तुलनेत १.४ टक्क्यांनी (१३ रुपये ९५ पैशांनी) वाढलेला होता. त्याचा गेल्या वर्षभरातील ११०६ रुपये किंमतीचा उच्चांक गेल्या २३ एप्रिल २०१८ रोजी तर ८२५ रु. चा नीचांक ४ डिसेंबर गाठला गेलेला असून तो शेअर बायबॅकच्या तयारीतही आलेला आहे.
 
काळा पैसा पांढरा करण्यातील चार्टर्ड अकाउंटंट (सीए) व वकिलांच्या भूमिकेवर आयकर विभागाची करडी नजर आहे. जर त्यांनी अशा प्रकारच्या खटपटी(ब्लॅक मनी व्हाईट करण्याच्या) केल्याचे आढळून आले तर त्यांच्यावर सरकारतर्फे कठोर कारवाईही केली जाणार आहे. या सीए व कायदेशीर सल्लागारांच्या फर्मच्या नावावर बनावट बँक खात्याशिवाय शेल कंपन्यांची नोंदणीही केली जात असल्याचा संशय आयकर विभागाला आहे. या शेल कंपन्या एन्ट्री ऑपरेटर म्हणून अशा रीतिने पैसा फिरवितात की मूळचा पैस कोणाचा तेच समजणे कठीण होऊन जात असते.
 
अशा शंभरपेक्षाही जास्त एंट्री ऑपरेटर्सविरोधात आयकर विभाग खटले दाखल करणार आहे. नोटबंदीदरम्यान या एंट्री ऑपरेटर्सची मोठ्या प्रमाणावरील हेराफेरी (पैशांची फिरवाफिरवी) उघड झाली होती. हे एंट्री ऑपरेटर्स ३ ते ५ टक्के कमिशन घेऊन ही हेराफेरी करीत असल्याचे आढळून आले आहे. आयकर विभागातर्फे कलम २७७-अ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. आयकर विभागाच्या तपासणीत कोलकाता येथे सर्वात जास्त शेल कंपन्या आढळून आल्या होत्या.
 
आरोग्यपूर्ण अन्नपदार्थ खाण्याबाबत वाढती जागरुकता पाहून फास्ट फूड व जंक फूड तयार करणार्‍या कंपन्यांनी येत्या काही वर्षात आपल्या उत्पादनातील मीठ, साखर व स्निग्धांश (फॅट)यांचे प्रमाण कमी करण्याचे ठरविले आहे. एफएसएसएआयच्या ईट राईट या मोहिमेत सहभागी होण्याचे ही या कंपन्यांनी निश्‍चित केले आहे. या कमी साखर मोहिमेचे स्वागत अनेक शेफ(पंचतारांकित हॉटेलातील स्वयंपाकी)नीही केले असून जीभेच्या ‘स्वादा’पेक्षा आरोग्याचा ‘आस्वाद’ अधिक महत्वाचा असल्याचे मतही व्यक्त केले आहे.
सार्वकालिक उंचीनंतर सेन्सेक्सची घसरण, निफ्टी ११ हजार बिंदूंपलीकडे
आठवड्याच्या शेवटून दुसर्‍या दिवशी गुरुवारी १२ रोजीही शेअर बाजारात तेजी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) ३६ हजार ६९९ बिंदूंची सार्वकालिक विक्रमी उंची गाठल्यानंतर थोडा घसरला. पण राष्ट्रीय शेअर बाजााचा निर्देशक ११ हजार बिंदूंच्या पलीकडे जाण्यात यशस्वी झाला. सेन्सेक्स बुधवारच्या बंद ३६ हजार २६५ बिंदूंवरुन आज सकाळी ३६ हजार ४२४ बिंदूंवर उघडत ३६ हजार ६९९ बिदूंच्या सार्वकालिक उच्च तर ३६ हजार ४२२ बिदूंच्या नीचांकी पातळीपर्यंत जाऊन आला. तर निफ्टी बुधवारच्या बंद १० हजार ९४८ बिंदूंवरुन आज सकाळी ११ हजार ६ बिंदूंवर उघडून ११ हजार ९५६ बिंदूंच्या वरच्या तर १० हजार ९९९ बिदूंच्या खालच्या पातळीपर्यंत जाऊन परतला. दिवसअखेरीस सेन्सेक्स २८२ बिंदूंनी वाढून ३६ हजार ५४८ बिंदूंवर तर निफ्टी ७४ बिंदूंनी वाढून ११ हजार २३ बिंदूंवर बंद झाला.
 
@@AUTHORINFO_V1@@