नवाज शरीफ आणि कन्या मरयम यांना आज अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |


इस्लामाबाद : पनामा पेपरमध्ये नाव आलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची कन्या मरयम शरीफ या दोघांनाही आज अटक होणार आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पनामा पेपरमध्ये शरीफ आणि त्यांच्या मुलीचे नाव आल्यामुळे पाकिस्तान न्यायालयाने दोघाही पिता-पुत्रीला अनुक्रमे दहा आणि सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे या दोघांचे इस्लामाबाद येथे आगमन झाल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात येणार आहे.

दरम्यान नवाज शरीफ आणि मरयम शरीफ हे दोघेही सध्या अबु धाबीवरून इस्लामाबादकडे येण्यासाठी म्हणून रवाना झाले आहेत. इंग्लंडवरून आज सकाळी ते प्रथम अबु धाबी येथे आले होते. त्यानंतर अबु धाबी विमानतळावरून ते इस्लामाबादकडे येण्यासाठी रवाना झाले आहे. दरम्यान शरीफ यांनी विमानामधून पाकिस्तानच्या जनतेसाठी एक संदेश पाठवला आहे.

आपल्याला शक्य असलेली प्रत्येक गोष्ट आपण केली आहे. परंतु तरी देखील न्यायालयाने आपल्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावली असून इस्लामाबादला आल्यानंतर आपल्याला थेट तुरुंगात घेऊन जाण्यात येणार आहे.  आपण पाकिस्तानच्या जनतेसाठी आणि पाकिस्तानच्या येणाऱ्या भावी पिढीसाठी हा त्याग करत आहोत, अशी प्रतिक्रिया शरीफ यांनी दिली आहे. तसेच अशा संकट समयी पाकिस्तानच्या जनतेनी आपली सोबत करावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@