निसर्गाला जपा, निसर्ग तुम्हाला जपेल : खा. पूनम महाजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |


 

मुंबई : अतिक्रमण काढलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जागेवर आज खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी २०,९०० झाडे लावण्यात आली असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई पोलीस, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि मुंबई युथ फोरम या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.


खासदार पूनमताई महाजन यांनी त्यांचे आवडते वडाचे झाड लावून या वृक्षारोपणाची सुरुवात केली. यावेळी त्या बोलताना म्हणल्या कि, "तुम्ही निसर्गाला जपलात तरच निसर्ग तुम्हाला जपेल, त्यामुळे आपण सर्वांनी वृक्षारोपण करायला पाहिजे. विकासासोबत निसर्गाचे संवर्धन देखील व्हायला हवे. त्यासाठी पर्यावरणप्रेमींनी पुढे यावे, केवळ वृक्षारोपण करून भागणार नाही तर त्या वृक्षांचे, पर्यायाने निसर्गाचे संवर्धन करण्याची जबादारी प्रत्येक नागरिकाने घ्यायला हवी". दरम्यान, दोन वर्षांपूर्वी महाजन यांनी या उपक्रमासाठी प्रयत्न सुरु केले होते. आता पुढची पाच वर्ष मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन या झाडांची काळजी घेणार आहे.

 

 
 

या कार्यक्रमाला वनाधिकारी श्री. अन्वर अहमद, मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती. अश्विनी भिडे, मेट्रो रेलचे अधिकारी श्री. गुप्ता, श्री. भट, दै. तरुण भारतचे संपादक श्री. किरण शेलार, नगरसेवक श्री. सुषम सावन्त, हरिष भांदिर्गे, श्री. प्रकाश मोरे यांच्यासह मुंबई पोलीस, वन कर्मचारी, भाजपा तसेच भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@