भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |




फिनलंड: भारतीय महिला क्रीडापटू एकामागोमाग एक अभिमानास्पद कामगिरी करत असताना हिमा दास नामक आणखी एका धावपटूने नवा इतिहास रचत देशवासीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. भारताची वेगवान धावपटू हिमा दास हिने आयएएएफ वर्ल्डस (अंडर २० ) ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ४०० मीटरच्या अंतिम फेरीत शुक्रवारी सुवर्णपदक पटकावले. ‘ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारी हिमा पहिली भारतीय महिला ठरली.

 

१८ वर्षीय हिमाने केवळ ५१ .४६ सेकंदात ४०० मीटरचे अंतर पार करीत पहिले स्थान मिळवत सदर विक्रम नोंदवला. हिमाने बुधवारी उपांत्य फेरीतदेखील केवळ ५२ .१० सेकंदात पहिला क्रमांक पटकावला होता. मूळची आसामची असलेल्या हिमा दासने याचवर्षी एप्रिल महिन्यात गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये अंडर २० मध्येच अवघ्या ५१ .३२ सेकंदात शर्यत पार करीत सहावे स्थान पटकावले होते. त्यानंतर अथकपणे, सातत्याने तिने आपली कामगिरी सुधारत नेली अखेर जागतिक स्तरावर आपले नाव कोरले. नुकतेच हिमाने आंतरराज्यीय चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक जिंकले होते. शुक्रवारच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर हिमा दास आता प्रसिद्ध भालाफेक खेळाडू नीरज चोपडाच्या क्लबमध्ये सामील झाली आहे. नीरजने 2016 मध्ये जागतिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. जागतिक अंडर २० चॅम्पियनशीपमध्ये यापूर्वी भारतासाठी सीमा पूनियाने 2002 मधील डिस्कस थ्रोमध्ये कांस्य तसेच, नवजीतकौर ढिल्लनने २०१४ मध्ये ब्रॉन्झ पदक जिंकले होते. हिमा दास हिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सार्या देशातून तिचे अभिनंदन करण्यात आले. हिमाने देशाची मान गर्वाने उंचावली असल्याची भावना हजारो भारतीयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली.

@@AUTHORINFO_V1@@