भारताच्या हिमा दासची अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |
 

 
 
टाम्पेरे (फिनलँड) : येथे सुरू असलेल्या विश्व ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या हिमा दासने २० वर्षाखालील मुलींच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे. तिच्या या सुवर्ण कामगिरीमुळे जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील ४०० मीटर ट्रॅकसाठी सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली आहे.
 
हिमाने ५१.४६ सेकंद इतका वेळ घेत ही शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत रोमानियाच्या अँड्रिया मिकलोसला (५२.०७ सेकंद) रौप्य व अमेरिकेच्या टेलर मान्सनला (५२.२८ सेकंद) कांस्यपदक मिळाले आहे. यापूर्वी हिमाच्या आधी कोणीही भारतीय महिला धावपटू प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक कोणत्याही स्तरावर विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकू शकलेली नाही.
 
 
 
 
हिमाच्या या विजयामुळे संपूर्ण भारतातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठौड, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हिमाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे.
 
 
 
 
तसेच यावेळी हिमाने, माझ्या खांद्यावर भारतीय ध्वज धरण्याचा मला अभिमान आहे, "मी भारताची, माझ्या संघाची आणि माझ्या प्रशिक्षकांची खूप आभारी आहे." असे मनोगत व्यक्त केले. त्याबरोबरच मला अजूनही विश्वास बसत नाहीये हे माझ्यासाठी खूप खडतर होते. पण त्या सुवर्णपदकासाठी मी धडपडत होते. आता मी माझ्यापेक्षा वरिष्ठ धावपटूंसोबतही धावू शकेन याचा मला विश्वास वाटतो आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे, असेही तिने सांगितले.
 
 
  
 
@@AUTHORINFO_V1@@