पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षकांना आवश्यक साधनसामुग्री देण्यात येईल- डॉ.रणजीत पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
मुंबई : राज्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या जीवरक्षकांना (लाईफ गार्ड) आवश्यक असलेली लाईफ जॅकेट, दोर, स्क्रीन व मेगाफोन यासारखी साधनसामुग्री व अद्ययावत उपकरणे देण्यात येतील. या जीवरक्षकांना दिलेल्या उपकरणांचे वेळोवेळी व विशेषत: पावसाळ्यात ऑडिट करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेतील लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.
 
 
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील वेणा प्रकल्प जलाशयात झालेल्या दुर्घटनेबाबत तसेच मुंबईतील जुहू चौपाटी व मरिन ड्राईव्ह येथील दुर्घटनेबाबत माहिती देताना डॉ. पाटील म्हणाले, मुंबईतील २९ ठिकाणे संवेदनशील म्हणून परिचित आहेत. मुंबईतील वर्दळीच्या जुहू, गोराई, वरळी, दादर, गिरगाव चौपाटी, अक्सा, मढ या ६ समुद्र किनाऱ्यांवर ३७ लाईफ गार्ड कार्यरत असून आपत्कालीन व्यवस्था म्हणून ११८ कर्मचाऱ्यांची शिफ्टप्रमाणे नेमणूक करण्यात येते. या लाईफ गार्डसना मुंबई महानगरपालिकेतर्फे आवश्यक ती साधनसामुग्री देण्यात येईल व त्यांचे वेतन वाढविण्यासंबंधीही विचार करण्यात येईल.
 
 
नागपूर दुर्घटनेतील वेणा जलाशयातील दुर्घटनेबाबत चौकशी करण्यात येईल. तसेच वेण्णा जलाशयातील मासेमारीच्या बोटींचे नियंत्रण करण्याची जबाबदारी मत्स्योत्पादन विभागाची होती. अनधिकृतपणे या जलाशयात मासेमारी करणाऱ्या बोटींची चौकशी करण्यात येईल व चौकशी करुन दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
 
 
डॉ. पाटील पुढे म्हणाले, पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी गृहविभाग, पर्यटन विभाग, नगरविकास विभाग यांच्या समन्वयाने सुरक्षेबाबत एकात्मिक आराखडा बनवून पर्यटकांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात येईल. धोकादायक पावसाळी पर्यटन क्षेत्र निश्चित करुन त्या त्या ठिकाणी सुरक्षेचे फलक लावण्यात येतील. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@