शशी थरूर यांची पाच वादग्रस्त प्रकरणे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |


 

 

'२०१९ च्या निवडणुका भाजपाने जिंकल्या तर देशाचा हिंदू पाकिस्तान होईल' असे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते. यामुळे देशभरात बराच वाद निर्माण झाला आहे. मात्र शशी थरूर आणि वाद हा प्रकार काही नवीन नाही. नऊ वर्षांपूर्वी राष्ट्रीय राजकारणात एंट्री मारल्यापासून थरूर आणि वाद यांचा घनिष्ठ संबंध राहिला आहे. यातही थरूर आणि त्यांच्या मैत्रिणी अशीच वादग्रस्त प्रकरणे जास्त आहेत. त्यामुळे शशी थरूर आणि त्यांनी निर्माण केलेल्या काही प्रमुख वादांवर एक नजर टाकुयात...

 

1) मेहेर तरार प्रकरण

 

थरूर यांचं मेहेर तरार हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक गाजलं होतं. थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर या आजारी होत्या. त्यावेळी त्या वैद्यकीय उपचारांसाठी परदेशी गेल्या असताना पाकिस्तानातील ४५ वर्षीय पत्रकार मेहेर तरार हिने शशी थरूर यांच्याशी जवळीक साधली आणि आपल्या संसारात मीठ कालावल्याचा आरोप सुनंदा पुष्कर यांनी केला होता. मात्र हे प्रकार एवढ्यावरच थांबता मेहेर तरार सुनंदा पुष्कर यांचा वाद ट्विटरवर रंगला. यात तरार या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एजंट असल्याचा आरोपही पुष्कर यांनी केला होता. या वादात थरूर केंद्र स्थानी होते.

 

2) 'कॅटल क्लास' प्रकरण

 

२००९ साली आर्थिक मंदीचा आणि महागाईची भर ओसरेपर्यंत सर्व केंद्रीय मंत्र्यांनी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करावा, असे मनमोहन सिंग सरकारचे आदेश होते. यावेळी थरूर पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबलेले होते. यावरून मंत्रिमंडळाने त्यांना समज दिली होती. राजेशाही थाट करायला आपल्याला मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर, थरूरांचा संताप अनावर झाला आणि थरूर यांनी इकॉनॉमी क्लासचा ट्विटरवरकॅटल क्लास’ (जनावरांचा गोठा) असा तुच्छतापूर्वक उल्लेख केला. यामुळे ते अडचणीत सापडले होते. तसेच त्यांच्यावर सर्वच थरातून टीका झाली होती.

 

3) आयपीएल आणि शशी थरूर

 

२०१० साली शशी थरूर यांना आयपीएलमधील भागीदारीमुळे मनमोहन सिंग मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. कोची टस्कर्स या आयपीएल फ्रेंचायझीच्या भागधारकांमध्ये सुनंदा पुष्कर यांचा समावेश होता. त्यासाठी शशी थरूर यांनी राजकीय बळाचा वापर केल्याचा आरोप होता. तसेच कोची संघाच्या मालकीतील संशयास्पद व्यवहारांमुळे सुनंदा पुष्कर शशी थरुर यांच्यावर आरोपही करण्यात आले होते.

 

4) नेहरू गांधी यांची विदेशनीती

 

ब्रिटिश संसद सदस्य लॉर्ड भिकू पारेख यांनी नेहरू-गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या विदेशनीतीवर टीका केली होती. पारेख यांच्या मताचे थरूर यांनी सार्वजनिक व्यासपीठावर समर्थन केले होते. यामुळे काँग्रेस पक्ष गांधी घराणे थरूर यांच्यावर नाराज होते.

 

5) सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू

 

शशी थरूर यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा वाद म्हणजे त्यांच्या पत्नी सुनंदा यांचा दिल्लीतील आलिशान हॉटेलमध्ये झालेला संशयास्पद मृत्यू. याप्रकरणी थरूर यांच्यावर सुनंदा यांची विष पाजून हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ करणे अशी कलमे लावली गेली आहेत. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट असून थरूर यांना देश सोडून जायला मनाई आहे.

@@AUTHORINFO_V1@@