निवडणूक आयोगाच्या सचिवांनी सुनावले खडे बोल...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |

आढावा बैठकीत अधिकार्‍यांची झाडाझडती
१९ प्रभागासाठी व्हीडीओ चित्रीकरणाचे १९ पथक नेमण्याची सूचना

 
अवैध दारु विक्रीप्रश्‍नी बोलती बंद
‘निवडणूक नको पण कारवाई आवरा...’ अनेक उमेदवार माघारीच्या मुदतीतच
काढता पाय घेण्याची शक्यता...
जळगाव, १३ जुलै :
मनपा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत मद्याचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे, या विभागाने अद्याप कारवाई केली नाही. उद्यापासून कारवाई करा असे निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी असे खडेबोल आढावा बैठकीत सुनावले. याचबरोबर उमेदवारांचा दररोजचा खर्च हा तपासला गेलाच पाहिजे, खर्चात चुकीची माहिती आढळल्यास अधिकार्‍यांनी उमेदवारावर कारवाई करावी, अशा सुचनाही त्यांनी केल्या. यामुळे आतापासूनच अधिकार्‍यांची झोप उडाली असून अनेक उमेदवार ‘निवडणूक नको पण कारवाई आवरा...’असे म्हणत माघारीच्या मुदतीतच काढता पाय घेतील, असे चित्र आहे.
 
 
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे,आचार संहिता विभागाचे राहुल मुंडके, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रेय कराळे उपस्थित होते. निवडणुक तयारी बाबत आढावा घेण्यात आला.
 
१९ प्रभागात व्हिडीओ चित्रीकरणाची १९ पथके तयार करण्याची सूचना
शेखर चन्ने यांनी अधिकार्‍यांना काय उपाय योजना केल्यात याबाबत विचारणा केली. यावेळी मुंडके यांनी सहा पथके तयार केली असल्याची माहिती दिली. यावर पथक संख्या वाढवा अशी सुचना त्यांनी केली. सहा पथकाकडून १९ प्रभागातील उमेदवारांचा प्रचारफेर्‍या, खर्च, आलेल्या तक्रारी कशा काय सोडवतील. त्यासाठी १९ प्रभागात व्हिडीओ चित्रीकरणाचे १९ पथक तयार हे अर्ज माघारी घेण्याच्या तारखेपूर्वी तयार करण्याच्या सूचना दिल्या. उमेदवारांकडून मतदारांना हेल्पलाईनवर कोणीही मदत करत नाही.
 
 
मतदारांना पैश्याचे प्रलोभन दाखविण्यात येईल त्यामुळे त्यावर लक्ष ठेवा. पैसा वाटप होत असल्याची शंका असल्यास त्यावर कारवाई करा. शहरात सर्व घरामध्ये वोटर स्लिप वाटप करा. रिपोर्टीग ऍप तयार करून यादीवर मतदान घ्या. त्यामध्ये बदल करू नका. अशा सुचनाही त्यानी दिल्या.
छुपा खर्च कुठे आहे, याचा शोध घ्या...
चुकीचा हिशोब दिल्यास कारवाई हवी
निवडणुकांमध्ये आतापर्यंत हिशोब न दिल्याने कारवाई केली गेली आहे. परंतू चुकीचा हिशोब दाखविणार्‍यावर का कारवाई होत नाही. त्यामुळे केलेल्या खर्चापेक्षा कमी खर्च दाखविणार्‍यावर कारवाई करण्याच्या सूचना निवडणुक खर्च निरीक्षकांना दिल्या. तसेच आयकर अधिकारी, सेल टॅक्स अधिकार्‍यांना सचिवांनी खर्चाचा ताळमेळ तपासण्याचे काम आहेच पण छुपा खर्च कुठे आहे याचा देखील तुम्ही शोध घ्या अशा सुचना दिल्या.
सोशल मिडीयातून जनजागृती
चन्ने यांनी आयुक्त डांगे यांना निवडणुक तयारी तसेच मतदानाचा टक्का वाढविण्याबाबत माहिती विचारली. यावेळी आयुक्तांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सोशल मिडीया, व्हॉटसअप, बॅनर आदी माध्यमातून जनजागृती केली जात असल्याचे सांगितले. तर निवडणुकीबाबत सर्व तयारी झाले असल्याचे सांगितले.
बंदोबस्तासाठी अडीच हजार अधिकारी व पोलीस कर्मचारी
पोलिस अधिक्षक कराळे यांना निवडणुकी तयारीबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, की पोलिस विभागाकडून यंत्रणा तयार असून ९ डिवायएसपी, २५ पोलिस निरीक्षक, २५० अधिकारी कर्मचारी असा एकूण अडीच हजाराचा पोलिस बंदोबस्त असणार आहे. तसेच सोशल मिडायाद्वारे अफवा, आक्षेपार्ह मजकूर य बाबत सायबर सेलच्या माध्मयातून लक्ष ठेवले जात आहे. तसेच भरारी पथक, संवेदनशील वॉर्डामध्ये फिरत असून गुन्हेगारांवार प्रतिंबधात्मक कारवाईचे प्रस्ताव तयार केले आहे. महिनाभरात २४ गुन्हेगार, दारु अवैध व्यवसायिकांवर कारवाई व प्रस्ताव तयार असल्याचे कराळे यांनी सांगितले.
दारुचा महापूर ?...राज्य उत्पादन शुल्क
 
अधिक्षक निरुत्तर
चन्ने यांनी राज्य उत्पादन शुल्काचे अधिक्षक एस. एन. आढावा यांना अवैध दारु विक्रीबाबत उपाययोजनांची माहिती विचारली, काय उपाय योजना केल्या ? रेल्वेतून होणार्‍या दारुच्या अवैध वाहतुकीवर कारवाई केली का ? कुठे नाकाबंदी आहे ? छुप्या दारु विक्रीवर कारवाई काय ? आदी प्रश्‍नांचा विचारणा केली. प्रश्‍नांचा भडीमार झाल्याने मागील वर्षाची माहिती दिली. यावर सचिवांनी निवडणूक काळात काय उपाययोजना केली याची विचारणा केली असता ते निरुत्तर झाले.
 
@@AUTHORINFO_V1@@