बिहारमधील युती अतूट : अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |



पटना : बिहारमधील संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील युती ही अतूट असून येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये बिहारमधील सर्व जागांवर या युतीलाच विजय मिळेल, अशा विश्वास भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. काल झालेल्या आपल्या बिहार दौऱ्यानंतर त्यांनी आज ही प्रतिक्रिया दिली आहे.

शाह यांनी काल आपल्या बिहार दौऱ्यादरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्यासह दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यामध्ये नितीश कुमार आणि शाह यांची बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या विषयांवर तसेच निवडणुकीसंबंधीच्या नव्या रणनीतीवर देखील चर्चा झाली. या चर्चेमध्ये दोन्ही पक्षांकडून अत्यंत सकारात्मक भूमिका घेण्यात आली असून येत्या लोकसभेत या दोन्ही पक्षांची युती कायम राहील, असे आश्वासन दोन्ही नेत्यांनी दिले आहे.

याचबरोबर शाह यांनी बिहारमध्ये भाजपच्या आयटी सेलदेखील मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी देशात नव्याने तयार होत असलेल्या महागठबंधनवर जोरदार टीका केली. तसेच देशात कितीही मोठे गठबंधन झाले तरी देखील विकासाच्या मुद्द्यावर देशातील जनता भाजपलाच पाठींबा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
@@AUTHORINFO_V1@@