रस्ते कॉंक्रिटीकरणाला मंजूरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |

वरणगाव शहरासाठी १ कोटी ७० लाख रुपये खर्च
स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय

 
 
वरणगाव :
येथील नगरपरिषदेच्या सभागृहात बुधवारी स्थायी समितीची बैठक नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत एक कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी खर्च करून शहराच्या विविध प्रभागातील रस्ते कॉंक्रिटीकरणाचा निर्णय घेण्यात आला.
 
शहराच्या विविध प्रभागातील विकास कामांना बसलेली खीळ लक्षात घेता ११ रोजी स्थायी समीतीची बैठक घेण्यात आली. सुरवातीला वरणगाव नगरपरिषदेचा स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये भारतात ७० व्या क्रमांक विभागात चौथा क्रमांक आणि जळगाव जिल्ह्यात दुसरा क्रमांक आल्याचे श्रेय सार्‍या वरणगावकरांचे आहे, म्हणून वरणगावातील तमाम माता, भगिनी आणि ज्येष्ठांसह तरुण बंधूच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.
 
प्रमुख घटक म्हणून डॉक्टर, विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, पत्रकार शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, हॉटेल व्यवसायिक मालक, आरोग्य दूत यांचा गौरव समारंभ घेण्याचे ठरले. तसेच राज्याचे कृषीमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांचे दुःखद निधन झाल्याबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्थायी समितीच्या सभेत नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसुफ , आरोग्य सभापती नसरीनबी साजिद कुरेशी, महिला बालकल्याण सभापती माला मेढे, बांधकाम सभापती शशी कोलते उपस्थित होते. सभेचे लिपिक अनिल तायडे यांनी कामकाज पाहिले. सभेमध्ये वरणगाव शहरातील प्रलंबित कॉंक्रिटीकरणाकरीता १ कोटी ७० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम उत्तम दर्जाचे व अनेक वर्ष टिकावे, या दृष्टीने सतर्कता बाळगत केले जावे, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. हे लक्षात घेत पुढची पावलं टाकण्याचा संकल्पही करण्यात आला.
या प्रभागातील कामांना मिळाली मंजूरी
प्रभाग क्रमांक १० मधील जगदंबानगरातील इंगळे यांच्या पीठगिरणीपासून एम.एस.ई.बी.कार्यालयापर्यंत कॉंक्रिटीकरण रस्ता ४५ लाख ४८ हजार व प्रभाग क्रमांक १५ गंगाराम धनगर यांच्या घराजवळून मज्जीदपर्यंत ३५ लाख ८२ हजार तसेच प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मधील एकूण ४० लाख ९४ हजार रुपये प्रभाग क्रमांक ९ मध्ये ४७ लाख ७६ हजार रुपये एकूण १ एक कोटी ७० लाख रुपयांच्या रस्ता कॉंक्रिटीकरण sकामांना मंजुरी देत ती रितसर प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
@@AUTHORINFO_V1@@