भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018
Total Views |



नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंडमधील नॉटिंगहॅम येथे आजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होणार असून टी-२० मालिका जिंकल्यानंतर आता एकदिवसीय मालिका देखील आपल्या खिशात घालण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.


नॉटिंगहॅममधील ट्रेन्ट ब्रिज मैदानावर आज या मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज मैदानात उतरणार आहे. तसेच टी-२० सामन्यामधील भारतीय संघ हा या सामन्यांसाठी कायम ठेवण्यात आला आहे. यामध्ये कोहलीसह रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, श्रेयस अय्यर, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, अक्सर पटेल, भुवनेश्वर पटेल, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, सिद्धार्थ कौल आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे टी-२० पाठोपाठ आता एकदिवसीय सामना देखील भारतीय संघ आपल्या खिशात घालेल अशी आशा सर्व क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.



भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही दुसरी मालिका आहे. याअगोदर भारत आणि इंग्लंड याच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली गेली होती. ही मालिका भारताने २-१ अशा गुणांनी जिंकली होती. तसेच या एकदिवसीय मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळवली जाणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@