मुसळधार पावसाचा सिंधुदुर्गला देखील फटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018
Total Views |



सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर मोठे संकट कोसळले आहे. मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि नद्याला आलेले पूर यामुळे जिल्ह्यातील वस्ती आणि पाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आता शेतामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणीसाठू लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा देखील आता संकटात सापडला आहे.

गेल्या आठवड्याभरापासून कोकणामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहेत. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ओढे आणि नाले हे दुथडी भरून वाहू लागले आहेत. परिणाम ओढ्यांचे पाणी थेट जवळील वस्ती आणि पाड्यांमध्ये शिरत आहेत. तसेच वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे बराच घरांची देखील पडझड झाली आहे. त्यामुळे ऐन पावसामुळे अनेकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. वस्त्यांबरोबरच अनेक ठिकाणी शेतांमध्ये देखील पावसाचे पाणी शिरले आहे. शेतामध्ये पाणी भरल्यामुळे बळीराजाला देखील आता चिंता सतावू लागली आहे.
@@AUTHORINFO_V1@@