आषाढी वारी : पालखी सोहळ्याचा आज सातवा दिवस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018
Total Views |


संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा जेजुरीहून रवाना



पुणे : आषाढी वारीच्या आजच्या सातव्या संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी जेजुरीहून वाल्हे शुक्लवाडी याठिकाणी जाण्यासाठी रवाना झाला आहे. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पालखीची पहाटपूजा उरकल्यानंतर पालखी पुढील मुक्कामासाठी रवाना झाली आहे.



दरम्यान वाटेतील आपल्या सकाळच्या विसाव्यासाठी म्हणून दौंडज शिव येथे पालखीने पहिला विसावा घेतला आहे. सकाळची न्याहारी करून तसेच थोडा वेळ आराम करून दुपारच्या विसाव्यासाठी म्हणून वाल्हे शुक्लवाडी येथे पालखीचे आगमन होईल. याठिकाणी दुपारचा विसावा नैवेद्य होईल व त्यानंतर आजचा मुक्काम याठिकाणीच केला जाईल.






तुकोबांच्या  पालखी सोहळ्याचे थोड्याच वेळात पाटस येथे आगमन  




माउलींबरोबरच संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा देखील मजल दरमजल करत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. आजच्या सातव्या दिवशी तुकोबारायांचा पालखी सोहळा वरवंड येथून गवळ्याची उडंबडीकडे जाण्यासाठी म्हणून रवाना झाला आहे. वाटेतील भागवत वस्ती येथे सकाळचा विसावा घेतल्यानंतर दुपारच्या विसाव्यासाठी म्हणून पालखी पाटस येथे दाखल होणार आहे. रोटी घाटाची अवघड चढण चढून गेल्यानंतर दुपारी पाटसमध्ये दुपारचा नैवेद्य होईल व त्यानंतर रात्रीचा मुक्काम हा गवळ्याची उडंबडी येथे होईल.



@@AUTHORINFO_V1@@