सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वृक्षलागवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018
Total Views |
 


पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. नितीन करमळकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठामध्ये नुकतीच वृक्षारोपणाची मोहिम हाती घेण्यात आली. त्यात प्रातिनिधिक ३० इतक्या झाडांचे रोपण करण्यात आले. या मोहिमेंतर्गत विद्यापीठाच्या विकास आराखड्यानुसार (मास्टर प्लॅन) इतरही अनेक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
 
या झाडांचे रोपण विद्यापीठामधील पर्यावरण शास्त्र विभागालगतच्या रस्त्याच्या कडेने कुलगुरुंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र. कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ. विद्या गारगोटे, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाते डॉ. विश्वास गायकवाड, डॉ. प्रफुल्ल पवार, डॉ. विजय खरे आणि डॉ. दीपक माने यांच्यासहित विद्यापीठातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांकडून चाफ्याच्या रोपांचे रोपण करण्यात आले.
 
या वृक्षारोपणासाठी रंग व सुवास यांचे मिश्रण असलेली खास रोपे निवडण्यात आली होती. विद्यापीठाचा परिसर या कायमस्वरुपी टिकणाऱ्या वृक्षांमुळे अधिक नयनरम्य दिसावा, हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@