शिवसेनेचा बहुळा धरणावर रास्तारोको

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018
Total Views |

निधी मंजूर करा, उतावळीचे ‘पाणी वळवण्याची मागणी’

 
पाचोरा :
जलपातळी वाढण्यासाठी व शेती आणि शेतकर्‍यांच्या भल्यासाठी दूरचा विचार करुन उतावळी नदीचे वाया जाणारे पाणी बहुळा धरणात वळविण्यात यावे, या व्यापक जनहिताच्या मागणीसाठी पाचोरा शिवसेनेतर्फे बहुळा धरणावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
 
 
उतावळी नदीचे वाया जाणारे पावसाचे पाणी बहुळा जळगाव-पाचोरा मार्गावरील मध्यम प्रकल्पात, बहुळा नदीवरील धरणात वळविण्यासाठीचा निधी तातडीने उपलब्ध देण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रास्तारोको करण्यात आले यावर्षी तरी या नदीचे वाहून वाया जाणारे पाणी बहुळा धरणात सोडण्यात यावे,यासाठी लागणारा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, यासाठी रास्तारोको आंदोलन जिल्हा सहसंपर्कप्रमुख माजी आमदार आर.ओ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. नागपूरला सुरु असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा जनहिताचा विषय उपस्थित केला जावा व मागणी त्वरीत पूर्ण करावी अशी मागणी जि.प सदस्य रावसाहेब पाटील यांनी केली.
 
 
यावेळी या मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार कडनोर यांना देण्यात आले. शांतता व सुरक्षितेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, पोलीस निरीक्षक इंगळे, उपपोलिस निरीक्षक संदीप पाटील व सानप यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.‘रास्ता रोको’मध्ये जि.प सदस्य दिपकसिंग राजपूत, पदमसिंग पाटील ,नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, ऍड.दिनकर दिवरे मुकुंद बिल्दीकर, उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, अरुण पाटील, बापू हटकर, आनंद पगारे, जावेद शेख, संदीप राजे, अनिकेत सुर्यवंशी, जितेंद्र पेंढारकर, वैभव राजपूत, विशाल राजपूत गणेश पाटील, ,रवींद्र पाटील, पंढरी पाटील, सरपंच डी.के. पाटील ,मनोज साहेबराव पाटील, शिवाजी तावडे, ,विलास पाटील, बालाजी पाटील आणि अजयकुमार जयस्वाल यांच्यासह शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 
गिरीश महाजन यांच्याकडून अपेक्षा
आर. ओ. पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत उतावळी नदीचे वाया जाणारे पावसाचे पाणी बहुळा धरणात वळविण्यासाठी त्यावेळी शासनदरबारी पाठपुरावा करुन त्या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण करण्यात यशही मिळवले. उर्वरीत काम हे आपल्या जिल्ह्याचे आमदार गिरीश महाजन हे राज्याचे जलसंपदा मंत्री असूनही पूर्ण होऊ शकलेले नाही.
 
आ.किशोर पाटील यांनी केला पाठपुरावा
वारंवार आ.किशोर पाटील यांनी पाठपुरावा करून सुध्दा अपूर्ण निधी उपलब्ध न झाल्याने हे काम रखडले आहे. परिणामी २५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतात सिंचनाचा प्रश्न गंभीर होत आहे, असेही आंदोलकांचे म्हणणे आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@