वृक्षारोपण झाले.. संवर्धनाचे काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018
Total Views |

केवळ चमकोगिरीसाठी केले जातेय वृक्षारोपण

 
जळगाव :
शासनाने यंदा १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट हाती घेतले आहे. यासाठी राज्यातील सामाजिक वनीकरण विभाग, शिक्षण, आरोग्य, कृषी, महावितरण परिमंडळ तसेच आदी संस्थांनाही वृक्षरोपणाचे उद्दिट्य दिले आहे. या वृक्षारोपण सप्ताहात लहान- मोठ्या संस्था सहभागी होत असून दररोज विविध ठिकाणी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण केले जात आहे. मात्र त्याबरोबर वृक्षाचे संवर्धन करणे गरजेचे नाही का? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शहरात कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे अनेक लहान- मोठ्या संस्था उदयास येत आहेत.
 
 
नेत्यांची पुण्यतिथी असो वा जयंती किंवा एव्हाना काहीही निमित्त मिळाल्यास या संधीचा फायदा घेत केवळ चमकोगिरीसाठी ते उपक्रम राबवितात असेच म्हणावे लागेल. असाच प्रकार सध्या वृक्षरोपणाच्या बाबतीत सुरु आहे. दररोज कुठेना कुठे वृक्षारोपण पहावयास मिळत आहे. मात्र त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली असल्याचे कोठेच आढळत नाही, अशी खंत व्यक्त होत आहे. वृक्षारोपणाबरोबरच संगोपनाची आवश्यकता व्यक्त होत आहे.
सामाजिक बांधिलकी की,केवळ चमकोगिरी?
सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होवून यात सामाजिक भावनेने योगदान देेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र केवळ कुठेतरी प्रसिद्धी मिळेल, अशी इच्छा बाळगत सामाजिक कार्य करणे याला समाजाप्रती असलेली बांधिलकी म्हणावे की चमकोगिरी अशी शंका सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.
 
 
यंदा समाधानकारक वृक्षारोपण
शासनाच्या मोहिमेनुसार यंदा समाधानकारक वृक्षारोपण झाले असून यात अनेक महिला बचत गट, खासगी संस्था, शैक्षणिक संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला आहे. मात्र एकदा वृक्षारोपण केल्यानंतर त्याकडे फिरुनही बघितले जात नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षारोपण महत्त्वाचे असले तरी त्याचे संवर्धनही तितकेच गरजेचे आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@