स्वातंत्र्यदिनापूर्वीच निफ्टीचा नवीन विक्रमाचा झेंडा फडकणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018
Total Views |

‘दलाल स्ट्रीट’चा ताबा घेतला तेजीच्या बैलांनी!
सेन्सेक्स गेला ३६ हजार बिंदूंच्या पलीकडे, निफ्टी १० हजार ९५० बिंदूंवर

 
निफ्टी ओलांडणार १० हजार १७१ बिंदूंची विक्रमी पातळी ओलांडणार?
ट्रेड वॉरमध्ये अमेरिकेचे आणखी एक पाऊल, १० टक्के आयात शुल्क लागू
 
 
येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाआधीच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) नव्या उच्चांकी विक्रमाचा झेंडा फडकवणार असल्याचे भाकित तज्ञांनी केले आहे! कालच मंगळवारी १० जुलै रोजी निफ्टीने फेबु्रवारीपासून प्रथमच १० हजार ९०० बिंदूंची पातळी ओलांडली असून मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स)ही ३६ हजार बिंदूंच्या उंचीवर परतलेला आहे. तेजीच्या बुल्सनी ‘दलाल स्ट्रीट’(शेअर बाजारा)चा ताबा घेतला असून मंदीच्या अस्वलांना ‘धोबीपछाड दिली’ असल्याचे चित्र दिसत आहे.
 
इकडे अमेरिका व चीन दरम्यान व्यापारयुद्ध रंगत असतांना जागतिक बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले असले तरी त्याचा काहीही परिणाम भारतातील तेजीच्या बुल्सवर झालेला दिसत नाही. तसेच रुपयाचे अवमूल्यन व कच्च्या खनिज तेला(क्रूड) च्या वाढत्या किंमती याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले आहे. याला कारण सध्या मान्सूनची सुरु असलेली संपूर्ण देशभरा तील घोडदौड व जुलै महिन्यातील तिमाही निकालांचा सुरु झालेला हंगाम होय. सद्य आर्थिक वर्षा (२०१८-१९) च्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीचे निकाल गेल्या आर्थिक वर्षा(२०१७-१८)च्या जानेवारी ते मार्च या तिमाहीच्या तुलनेत चांगले लागणार असल्याचे अनुमान आहे. या पार्श्‍वभूमिवर निफ्टीने सोमवार व मंगळवार या दोनच दिवसात सुमारे पावणे दोनशे बिंदूंची झेप घेत तो १० हजार ९० बिंदूंच्याही पलीकडे गेला होता. आजही सकाळी तो १० हजार ९७६ बिंदूंपर्यंत जाऊन पोहोचला होता. याचाच अर्थ असा की तेजीच्या बैलांनी ‘चिंतेची भिंत’ (वॉल ऑफ वरीज) ओलांडली असून या जुलैतच ते बाजाराच्या शर्यतीत नवा विक्रम नोंदविण्याच्या तयारीत आले आहेत. आतापर्यंतचा निफ्टीचा विक्रम ११ हजार १७१ बिंदूंचा असून तो याच वर्षीच्या जानेवारीत गाठला गेला होता. पण सरकारने अर्थसंकल्पात लॉंग टर्म गेन टॅक्स(दीर्घकालीन मिळकत कर) समाविष्ट करताच निफ्टीला जी उतरती भांजणी लागली ती आता थांबण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तज्ञांच्या मतानुसार आता बाजार तेजीत विक्री (सेल इन रॅलीज)वरुन मंदीत खरेदी (बाय ऑन डिप्स) या स्थितीत आलेला आहे. निफ्टीने आपला ११ हजार १७१ बिंदूंचा विक्रम मागे टाकल्यास तो थेट ११ हजार ५०० बिंदूंपर्यंतची मजल गाठू शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे. म्हणजेच १० हजार ५५० च्या नुकत्याच गाठलेल्या नीचांकानंतर तो सुमारे हजार बिंदूंची झेप घेऊ शकतो.
 
 
या पार्श्‍वभूमिवर निफ्टी आपल्या सार्वकालिक उच्चांकाला गाठल्यानंतर तो आणखी नवा विक्रम करण्याच्या तयारीत येऊ शकतो. तब्बल दोन महिन्यांच्या विशिष्ट मर्यादे(रेंजबाउंड)तील विश्रांतीनंतर तो ‘ताजातवाना’ होणार असून येत्या ऑगस्टमध्येही त्याने आपला सार्वकालिक उच्चांक (लाईफ टाईम हाय) नोंदविल्यास कुणालाही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर राष्ट्रीय झेंडा फडकवण्यापूर्वीच निफ्टीचा नवा उच्चांक प्रस्थापित होऊ शकतो असेही तज्ञांना वाटत आहे.
 
 
मग गुंतवणुकदारांना आता तटस्थपणे बसून राहायचे व जे काही होईल त्याकडे प्रेक्षकासारखे पाहत राहायचे काय? यावर तज्ञांनी सल्ला दिला आहे की, गुंतवणुकदारांनी निफ्टी १० हजार ८७६ ते १० हजार ८६० बिंदूंवर परतल्यानंतर चांगले लार्जकॅप्स(जास्त किंमतीचे शेअर्स) व मिडकॅप (मध्यम किंमतीचे शेअर्स) घ्यावेत. निफ्टीला १० हजार ९५० बिंदूंवर तीव्र प्रतिकार (रेझिस्टन्स) असून जर तो या पातळीच्या वर सातत्याने राहिला तर आगामी व्यापार सत्रा(ट्रेडिंग सेशन्स)त तो नवा उच्चांक गाठू शकतो. गुंतवणुकदारां(इन्व्हेस्टर्स)नी मधल्या तीन महिन्यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर घसरलेल्या मिडकॅपकडे लक्ष देण्यास हरकत नाही. इन्व्हेस्टर्सनी खाजगी बँका, स्वयंचलित वाहने (ऑटो), औेषध निर्मिती(फार्मा) व सिमेंट कंपन्यांचे शेअर्स यासह निवडक मिडकॅपमध्ये गुंतवणुक करण्यास हरकत नाही.
 
 
ट्रेड वॉरमध्ये अमेरिकेने आणखी एक पाऊल उचलीत चीनच्या २०० अब्ज डॉलर्सच्या ६००० उत्पादनांवर १० टक्के शुल्क लावणार असल्याचे जाहीर केले आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत बहुधा हे शुल्क लागू करण्यात येणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी येत्या ऑगस्टपर्यंत या प्रस्तावावर सुचना पाठविण्याचे आवाहन केले आहे. गेल्या आठवड्यातच चीन व अमेरिका यांनी एकमेकांवर शुल्क लागू केले आहे. त्यामुळे अशा प्रकारचे शुल्क लावण्याबद्दल दोन्ही देशांदरम्यान ‘रस्सीखेच’ (टग ऑफ वॉर) सुरु झाली आहे.
 
 
चीनच्या तुलनेत अमेरिके तील आयात वाढती असल्याने या देशातील उद्योगांवर विपरीत परिणाम होत असल्याने ट्रंप यांनी हे आयात कर लावण्याची घोषणा केली आहे. चीनमधून होणार्‍या प्रचंड निर्यातीमुळे दोन्ही देशांमधील व्यापार संतुलन ढासळून अमेरिकेचे अधिक नुकसान होऊ लागले आहे.
 
जोरदार तेजीनंतर शेअर बाजारात शांतता, निर्देशांक सपाटीवर बंद
आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी मंगळवारी १० रोजी शेअर बाजारात जोरदार तेजी अवतरल्यानंतर आज बुधवारी बाजारात कुठल्याही मोठया चढउताराविना शांततापूर्ण वातावरण राहिले होते. त्याचे दोन्ही निदशांक सपाटीवर बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) मंगळवारच्या बंद ३६ हजार २३९ बिंदूंवरुन आज सकाळी ३६ हजार २९९ बिंदूंवर उघडत ३६ हजार ३६२ बिदूंच्या उच्च तर ३६ हजार १६९ बिदूंच्या नीचांकी पातळीपर्यंत जाऊन आला. तर निफ्टी मंगळवारच्या बंद १० हजार ९४७ बिंदूंवरुन आज सकाळी १० हजार ९५६ बिंदूंवर उघडून १० हजार ९५६ बिंदूंच्या वरच्या तर १० हजार ९२३ बिदूंच्या खालच्या पातळीपर्यंत जाऊन परतला. दिवसअखेरीस सेन्सेक्स २६ बिंदूंने वाढून ३६ हजार २६५ बिंदूंवर तर निफ्टी एका बिंदूंने वाढून १० हजार ९४८ बिंदूंवर सपाटीवर बंद झाला. कच्च्या खनिज तेलाचा भाव ५७ रुपयांनी वाढून ५१०६ रुपये प्रतिपिंप एवढा झाला होता. तर सोने २८ रुपयांनी घटून ३० हजार ५०० रुपये प्रति दहा ग्रॅम तर चांदी ८६ रु.नी कमी होऊन ३९ हजार ७०७ रूपये प्रति किलो झाली होती. तर रुपयाचा रिझर्व बँकेचा रेफरन्स रेट प्रति डॉलर ६८ रु. ८२ पैसे इतका राहिला होता.
 
@@AUTHORINFO_V1@@