आता नागार्जुन पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018
Total Views |


 
 
मुंबई : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन आता पुन्हा एकदा तब्बल १५ वर्षांनी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटातून तो पुन्हा एकदा बॉलिवुडमध्ये आगमन करत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना अत्यंत आनंद झाला आहे. एकेकाळी बॉलिवुडवर देखील अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याचे आता आनंदाने स्वागत करण्यात येणार आहे.
 
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिकेतील आगामी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपट ते दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याआधी खुदा गवाह चित्रपटातून नागार्जुन आणि अमिताभ बच्चन एकत्र दिसले होते.
 
तसेच महेश भट्ट दिग्दर्शित जख्म या चित्रपटात त्यांनी पूजा भट्ट यांच्यासोबतही काम केले आहे. २००३मध्ये प्रदर्शित झालेल्या जेपी दत्ता यांच्या 'एलओसी' या हिंदी चित्रपटात त्यांनी शेवटचे काम केले होते.
.
@@AUTHORINFO_V1@@