मोटरसायकल चोरांना अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018
Total Views |
 
जळगाव, १२ जुलै :
भुसावळ येथील मनोज अनिल पाटील यांची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल गेल्या ४ जुलै रोजी भारतीय स्टेट बँकेजवळून चोरीस गेली होती. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद करण्यात यश मिळवले होते. तसेच त्यांच्याकडून मोटरसायकलही हस्तगत केली आहे.
 
 
या चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळालेल्या खबरीवरून पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख, स.पो.नि.मुरलीधर आमोदकर, नुरूद्दीन शेख, पोहेका नारायण पाटील, पोना महेंद्र पाटील, बापू पाटील, योगेश पाटील, पोकॉ मनोज दुसाने, सुशील पाटील, सचीन महाजन, प्रवीण हिवराळे, वैशाली महाजन, वहिदा तडवी यांचे पथक तयार केले होते. या पथकाने चोपडा येथे दिनेश रामलाल धनगर (३६) व नितीन ज्ञानेश्‍वर दांडेवर (३०) दोन्ही रा.गोजोरे, ता.भुसावळ यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे असलेली २५ हजार रूपये किमतीची मोटरसायकल जप्त करून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
@@AUTHORINFO_V1@@