देशातील महिलांचे सशक्तिकरण होणे गरजेचे : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : महिलांना जर सक्षम बनवायचे असेल तर देशातील महिलांचे सशक्तिकरण होणे गरजेचे आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. देशातील विविध राज्यांतील महिलांना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करतांना नरेंद्र मोदी बोलत होते. आजच्या महिलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. महिला कुठल्याही कामात मागे राहू शकत नाही. तंत्रज्ञानापासून ते अंतराळसारख्या क्षेत्रामध्ये महिलांनी नाव कमावले आहे असे ते यावेळी म्हणाले. 
 
 
 
 
 
 
 
महिलांना त्यांची योग्यता, क्षमता आणि त्यांच्यातील कला ओळखण्याची शक्यता आपण त्यांना निर्माण करून देणे गरजेचे आहे. आज देशातील १ कोटी महिलांशी मला संवाद साधण्याचा योग मिळाला आहे. या माध्यमातून प्रत्येक महिलांनी आपल्यातील उद्योगशील महिलेला जागे करणे गरजेचे आहे. महिलांमध्ये क्षमता आहेत मात्र त्या ओळखण्याची गरज आहे. मी देखील करू शकते असा विचार करून महिलांनी पुढे पाऊल टाकायला हवे असा संदेश नरेंद्र मोदी यांनी या १ कोटी महिलांना दिला.   
@@AUTHORINFO_V1@@