आषाढीनिमित्त भुसावळ-पंढरपूर विशेष रेल्वे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018
Total Views |
 
भुसावळ, १२ जुलैः
आषाढी एकादशीनिमित्त माजी महसूलमंत्री आ.एकनाथरावजी खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली, खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांनी पंढरपूरला जाण्यासाठी वारकरी व भाविकांसाठी विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
जिल्ह्यातील भाविक आणि वारकरी आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जातात. त्यांच्या सोयीसाठी२२ जुलै राजी भुसावळवरून पंढरपूरसाठी विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. ही रेल्वे सकाळी ९:१५ मिनिटांनी भुसावळ येथून निघेल व पंढरपूर येथे रात्री १०:१० मिनिटांनी पोहोचेल, २३ जुलैच्या रात्री ९:५० मिनिटांनी ही रेल्वे पंढरपूर येथून सुटेल. २४ रोजी दुपारी २:४० मिनिटांनी भुसावळ येथे पोहोचेल. वारकरी व भाविकांनी या रेल्वेचा लाभ घेण्याचे आवाहन खा.रक्षाताई खडसे यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@