डोंबिवलीत नाल्यात दोन तरुण वाहून गेले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2018
Total Views |

 
 

मुंबई : उपनगरात गेल्या चार दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर आज ओसरला असला तरीही काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरुच आहे. पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली आणि पाण्याचा निचरा झाला असला तरीही पश्चिम रेल्वेची वाहतूक मात्र अद्याप पूर्वपदावर आलेली नाही. दरम्यान, येत्या शनिवारपर्यंत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

 

डोंबिवलीत दोन जण वाहवून गेले

 

गेल्या चार दिवसाच्या मुसळधार पावसामुळे डोंबिवलीतील तुडूंब नाले भरले आहेत. याच नाल्याच्या प्रवाहात दोन तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. डोंबिवली पूर्वेतील नांदिवली येथील नाल्यात हर्षद नावाचा एक तरुण वाहून जात होता. आपला मित्र वाहून जात असल्याचे लक्षात आल्या नंतर त्याच्या मित्राने त्याला वाचवण्यासाठी उडी मारली मात्र पाण्याचा जोर एवढा होता कि दोघेही वाहून गेले. केडीएमसीच्या अग्नीशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत दोघाही तरूणांचा शोध लागला नसल्याने अद्याप बेपत्ता तरुणांचा शोध सुरुच आहे. 

@@AUTHORINFO_V1@@