राज्यसभा अध्यक्षांची खासदारांना 'गुड न्यूज'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2018
Total Views |




नवी दिल्ली : राज्यसभेतील खासदारांना अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी खुशखबर दिली आहे. येत्या पावसाळी अधिवशेनापासून खासदारांना राज्यसभेत २२ भाषांचा वापर करता येणार असून यामध्ये डोगरी, काश्मीरी, कोकणी, संथाळी आणि सिंधी या नवीन पाच भाषांच्या अनुवादाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे आता खासदारांना आपल्या मातृभाषेत सभागृहात बोलता येणं शक्य झालं आहे.

 

"आपल्या भावना व विचार कोणत्याही अडथळ्याविना व्यक्त करण्याचे मातृभाषा हे उत्तम माध्यम आहे. केवळ एखादी भाषा येत नाही म्हणून संसदेत खासदारांना व्यक्त होण्यात अडथळे निर्माण होऊ नये, यासाठी घटनेतील सूचीत समाविष्ट करण्यात आलेल्या २२ भाषांसाठी अनुवादाची सोय तात्काळ उपलब्ध करण्यात येत आहे". असे उपराष्ट्रपती तथा राज्यसभा अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले.

 

घटनेतील सूचिमध्ये समाविष्ट असणाऱ्या २२ भाषांपैकी १२ भाषांमध्ये तात्काळ अनुवादाची सोय आहे. यामध्ये मराठी, तमिळ, हिंदी, तेलुगू, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओरिया, पंजाबी आणि उर्दू भाषांचा समावेश आहे. आता यात नव्याने डोगरी, काश्मीरी, कोकणी, संथाळी आणि सिंधी या नवीन पाच भाषांचा समावेश झालं आहे.

@@AUTHORINFO_V1@@