विरोधी पक्षासह शिवसेनेचा विधानभवनात राडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2018
Total Views |



नागपूर : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज विरोधी पक्षासह शिवसेनेने गोंधळ घातला. नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक व राणेपुत्र आ. नितेश राणेंकडून राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. या झटापटीमध्ये सभापतींचे चोपदार व आमदार खाली पडल्याची घटना घडली. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले आहे.

 

पाँईट ऑफ इन्फर्मेशन अंतर्गत बोलण्याची परवानगी नाकारल्याने शिवसेना व विरोधकांनी गोंधळ घेतला. नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी नाणारवासियांचे आज विधान भवनाबाहेर आंदोलन सुरू आहे. याची माहिती देण्यासाठी सेना आमदार राजन साळवी यांनी अध्यक्षांकडे परवानगी मागितली मात्र विधानसभाध्यक्षांनी ती फेटाळल्याने शिवसेना आक्रमक झाली होती.

 

"हजारो शेतकरी विधानभवनाच्या बाहेर आहेत. त्यांची व्यथा जाणून घेण्याची आम्ही मागणी केली होती मात्र अध्यक्षांनी ती नाकारली. त्यामुळे आम्ही राजदंड पळवला. नाणार प्रकल्पाला सेनेचा कायम विरोध राहील". असे आ. प्रताप सरनाईक यांनी बोलताना सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@