मुंबई रेल्वेसाठी स्वतंत्र व्यवस्थापनाची गरज : मुंबई उच्च न्यायालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2018
Total Views |


मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबई रेल्वेच्या होणाऱ्या दुरवस्थेवर मुंबई उच्च न्यायालयाने स्थानिक प्रशासनाला चांगलेच फटकारले आहे. प्रत्येक पावसामध्ये मुंबईची रेल्वे सेवा कशी काय विस्कळीत होते ? असा थेट सवाल न्यायालयाने उपस्थित केला असून मुंबईसाठी 'स्वतंत्र रेल्वे बोर्ड'ची आवश्यकता असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.


गेल्या चार दिवसांपासून मुंबईमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. यामुळे शहरातील सामान्य नागरिकांना आणि विशेषतः नोकरदार वर्गाला याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला यावर जाब विचारात मान्सूनपूर्वी रेल्वे मार्गांची उंची का वाढवली जात नाही ? रेल्वेच्या प्राथमिक बाबींकडे का लक्ष दिले जात नाही ? असे प्रश्न विचारले.

यावर रेल्वे प्रशासनाने देखील आपली बाजू मांडत यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांचा प्रश्न उपस्थित केला. यावर न्यायालयाने मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्डची स्थापना करण्याचा सल्ला दिला. तसेच या बोर्डला सर्व प्रकारचे अधिकार देण्यात यावे, जेणेकरून स्थानिक समस्यांचा विचार करून त्यावर तोडगा काढता येईल, त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत यावर विचार करून आपले मत मांडावे, असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@