मुंबईत मुली असुरक्षित; पालकांची चिंता वाढली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2018
Total Views |


मुंबई : देशात मुलींवरील अत्याचार आणि अपहरणाच्या घटनात वाढ झाली असताना आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून चिंताजनक आकडेवारी समोर येत आहे. या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये गेल्या पाच वर्षात मुली हरवण्याचे आणि अपहरणाचे प्रमाण वाढले आहे. २०१३ ते २०१७ मध्ये १८ वर्षाखालील एकूण ५०५६ मुलींचे अपहरण किंवा हरवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातील ४७५८ मुली सापडल्या असून अजूनही ३७० मुली बेपत्ता आहेत.

 

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून २०१३ ते २०१७ याच कालावधीत मुलींचा अनैतिक कृत्यासाठी वापर केल्याचे एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ३७० मुलींचे नेमके काय झाले हा प्रश्न पोलीस प्रशासनाला सोडवता आला नाही. दरम्यान, दुसरीकडे याच कालावधीत २१६५२ महिलांचे अपहरण किंवा हरवाल्याच्या तक्रारी आहेत. त्यापैकी १९६८६ महिला सापडल्या आहेत. त्यामुळे हि आकडेवारी पालकांना चिंतेत टाकणारी असून आमच्या मुलींनी घराबाहेर पडावे कि नाही असा प्रश्न पालक विचारत आहेत.

 

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून हरवलेल्या/अपहरण झालेल्या मुलींची आकडेवारी

 

वर्ष      १८ वर्षाखाली मुली      १८ वर्षावरील महिला

 

        हरवलेले  |    सापडले               हरवलेले    सापडले

२०१३               ९२          ७९                         ४०४१    ३८२३

२०१४              १५००      १४७५                      ४१७०     ३९४३

२०१५               ९२७         ८७८                       ४३१५     ४०३९

२०१६               ११६९      १०९१                      ४५२७     ४०९६

२०१७               १३६८      १२३५                      ४५९९     ३७८५

एकूण               ५०५६    ४७५८                      २१६५२    १९६८६

@@AUTHORINFO_V1@@