मूर्तिकारांना विक्रीसाठी जागा मिळेना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2018
Total Views |



मुंबई : गणेशोत्सवाच्याआधी मूर्तिकरांना गणपतीची मूर्तीची विकण्यासाठी अडचण येत असल्याची बाब उघडकीस आली आहे. गणपतीची मूर्ती विकण्यासाठी जागा घेण्यासाठी पालिकेची परवानगी घ्यावी लागते. पण यंदा मुंबई महानगरपालिकेचे प्रशासन अनेक कारणे पुढे करून मूर्ती विकण्यासाठी, तसेच गणेश उत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी परवानगी नाकारत आहे. यासाठी आवश्यक असलेले धोरण पालिकेने आखलेले नाही. दरम्यान, आजच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये याविषयावर चर्चा करण्यात आली. त्यावर येत्या दोन दिवसांमध्ये गणेशमूर्ती विकण्यासाठी मूर्तिकारांना जागा द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर पालिकेने याबाबत धोरण तयार करावे, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले. मुंबई महानगरपालिकडे मूर्तीकारांना मंडप टाकण्यासाठी परवानगी मागितली होती.परंतु, पालिकेने या परवानगीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. गेल्यावर्षी ज्या मूर्तिकारांना परवानगी दिली होती. त्या मूर्तिकारांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे मूर्तिकारांमध्ये नाराजी पसरली आहे, असा हरकतीचा मुद्दा सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी उपस्थित केला. तसेच येत्या दोन दिवसात मूर्तिकारांना परवानगी द्या अशी मागणी त्यांनी केली; तर ‘क’ पश्चिम प्रभागात एका मूर्तिकाराला मूर्ती विक्रीसाठी मंडप बांधला होता. परंतु पालिकेच्या अधिकार्यांनी तो मंडप तोडला. त्यावर फुटपाथवर ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर आक्षेप का घेतला जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर प्रशासनाने या प्रकरणाची नोंद घ्यावी. तसेच मूर्तिकारांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत धोरण तयार करावेत,असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

@@AUTHORINFO_V1@@