सरकारमधील लोकच जातीय राजकारण करत आहेत : धनंजय मुंडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2018
Total Views |

 राईनपाड्यातील घटनेवरून सरकारवर टीका

घटनेतील पिडीत कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत देण्याची मागणी 






नागपूर : 'सरकारमध्ये आणि अप्रत्यक्षपणे सरकार चालवणारी लोकच आज राज्यामध्ये जातीय राजकारण करत असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांची डोकी भडकवण्याच काम करत आहेत,' असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज केला आहे. धुळे येथील राईनपाडा या गावात भटक्या विमुक्त समाजातील पाच नागरिकांच्या झालेल्या हत्येवर पावसाळी अधिवेशनच्या आजच्या सत्रात ते बोलत होते.

  
'राज्यामध्ये काही ठराविक लोक आहेत, जे सरकार आणि विरोधी पक्षांविरोधात अफवा पसरवण्याचे आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याविषयी विरोधकांनी सरकारला लेखी अर्ज दिला तरी देखील त्यावर सरकार कारवाई करत नाही. कारण त्यामध्ये सरकारच्याच जवळील काही लोक असल्यामुळे सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही. त्यामुळे आज या सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था ही फक्त काही ठराविक लोकांनाच मिळत असून इतर समाज मात्र वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहेत' अशी रोकठोक टीका मुंडे यांनी यावेळी केली.





संविधान बदलण्याच धाडस करतात, तर समाजाला चिरडण्याच का नाहीत करणार ?


सत्तेमध्ये असलेले लोक हे बाबसाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाला बदलण्याची भाषा करत आहेत. जे लोक बाबासाहेबांच संविधान बदलण्याच धाडस करू शकतात, ते लोक भटक्या मुक्तांना आणि इतर समाजाला चिरडण्याच धाडस का नाही करू शकत ? असा सवाल मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच समाजामध्ये अशाप्रकारेची जी प्रवृत्ती निर्माण होत आहे, त्यावर लवकरात लवकर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.



भाजप सरकारच्या काळात भटक्या विमुक्तांना बाहेर पडणे मुश्कील

राईनपाड्याच्या घटनेनंतर राज्यातील भटके विमुक्त आणि भिक्षेकरी समाज भिक्षेसाठी बाहेर पडणे बंद झाले आहेत. आज भटक्या समाजांमध्ये याघटनेमुळे प्रचंड भीती निर्माण झाली असून भाजप सरकारच्या काळामध्ये या समाजांना बाहेर पडणे मुश्कील झाली आहे, असे मुंडे यांनी म्हटले.


सरकारकडे करण्यात आल्या मागण्या :

* पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत

*कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी.

*पिडीत कुटुंबियांचे सरकारने पुनर्वसन करावे.

* घटनेची एसआयटी चौकशी केली जावी.

* भटक्या विमुक्तांसाठी नवीन योजना अस्तित्वात आणाव्यात.

तसेच अशा प्रकारची घटना घडू नये याची मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी. .

 
 
@@AUTHORINFO_V1@@