...तर इराणकडून मिळणाऱ्या सवलती बंद : इराण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2018
Total Views |

अमेरिकेचा बंदीनंतर भारतादेखील संबंध तोडेल अशी भीती



तेहरान : भारताने इराणकडून तेलखरेदी कमी केल्यास भारताला इराणकडून चाबाहार बंदरासंबंधी मिळणाऱ्या सर्व सवलती बंद करण्यात येतील, असा इशारा इराणकडून देण्यात आला आहे. इराणचे राजदूत मसूद रजवानियन रहागी यांनी याविषयी माहिती दिली असून भारत हा चाबाहरसंबंधी दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता केलेली नाही, असा दावा रहागी यांनी केला आहे. त्यामुळे भारत सरकारने इराणला दिलेल्या आश्वासनांची लवकर पूर्तता करावी, असे देखील इराणने म्हटले आहे.

अमेरिकेने इराणबरोबर केलेला अणु करार रद्द करण्याविषयी केलेल्या घोषणेनंतर अमेरिकेने इराणवर नवीन बंधने लाधली आहेत. या बंधनामुळेच भारत इराणमध्ये गुंतवणूक करत नसल्याची भीती इराणला वाटत आहे. तसेच भारत आपल्याकडून करत असलेल्या तेलाची खरेदी देखील बंद करण्याची भीती इराणकडून व्यक्त केली जात आहे, त्यामुळे इराणने भारताला याविषयी इशारा देत, इराणमधील गुंतवणूक आणि तेलखरेदी यामध्ये भारताने कसल्याही प्रकारची माघार घेऊ, नये असे इराणने म्हटले आहे.


भारताने चाबाहार बंदरासंबंधी करार करता याठिकाणी मोठी गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर इराणने भारताच्या मदतीने या बंदराच्या उभारणीचा बराचसा भाग पूर्ण केला आहे. परंतु अजूनही भारताने यामध्ये अपेक्षित गुंतवणूक केली नाही, असा दावा रहागी यांनी आपल्या वक्तव्यात केला आहे. तसेच अमेरिकेने अणु करारानंतर इराणवर लादलेल्या बंधनामुळे भारत-इराण यांच्यातील तेलाच्या व्यापारावर भारताने कसल्याही प्रकारचा परिणाम होऊ देऊ नये, अन्यथा इराणकडून या बंदरासंबंधी मिळणाऱ्या सर्व सवलती आम्ही बंद करू, असे रहागी यांनी म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@