नाणारवरुन विधानसभेत गोंधळ, राजदंड पळवण्याचा प्रयत्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2018
Total Views |


 
 
नागपूर : नाणारच्या मुद्यावरुन आज विधानसभेत गोंधळ झाला. शिवसेनेच्या आमदारांनी आज गोंधळ घालत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. यावरुन विधानसभेत मोठा गदारोळ झाला. नाणार प्रकल्प रद्द करण्यात यावा अशी शिवसेनेच्या आमदारांची मागणी होती. नितेश राणे यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला.
 
 
 
 
 
राजन साळवी यांनी देखील हा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. राणे आणि साळवी यांच्यातील झटापट पाहून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि वैभव नाईक यांनीही राजदंड पळवण्यासाठी झटापट सुरू केली. हा सर्व प्रकार पाहून अध्यक्षांच्या ३ चोपदारांनी हा राजदंड मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि तिन्ही आमदारांना बाजूला सारत राजदंड ताब्यात घेतला. सभागृहातील हा गोंधळ पाहता, अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेचे कामकाज दिवसभारसाठी तहकूब केले.
 
"नाणारहुन नागपूरला आलेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाची माहिती सभागृहाला देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र, आम्हाला सभागृहात बोलू दिले नाही. त्यामुळे शिवसेनेची आक्रमकता दाखवण्यासाठीच आम्ही आम्ही असे केले." असे प्रतिपादन राजन साळवी यांनी केले. "आता याबाबत सरकारसोबत कोणतीही चर्चा नको, तर फक्त नाणार रद्द केला, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी." अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
@@AUTHORINFO_V1@@