मुंबईकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष : अजित पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2018
Total Views |

 
 
 
नागपूर : हवामान खात्याने मुंबईतील पावसाचा अंदाज दिला होता. आज मुंबईकरांना आणि तिथे येणाऱ्या पर्यटकांना अनेक दुर्दैवी गोष्टींचा सामना करावा लागला आहे. विमान कोसळले, इमारती कोसळत आहेत, रस्ते खचत आहेत, पर्यटक समुद्रात बुडत आहेत अशा अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत. पण सरकार आणि प्रशासन काय करतंय? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज उपस्थित केला. नागपूर पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबईकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेले असते मात्र पावसाळ्यामुळे मुंबईच्या अवस्थेकडे राज्य सरकारचेच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला.
 
 
 
आम्ही देखील सरकार चालवले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई महानगरपालिकेतील प्रशासकीय अधिकारी, मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, एमएमआरडीएचे लोक, राज्य सरकारच्या नगरविकास खात्यातील अधिकारी, काही एनजीओची माणसं असे सगळे मिळून नियोजन करतात. अशी बैठक दर वर्षी होते. हे सगळ्यांना घेऊन काम करण्यात सरकार कमी पडत आहे. त्यामुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले. मुंबई शहर आणि उपनगरांच्या पालकमंत्र्यांनी नागपुरात न थांबता मुंबईला जाऊन तिथली परिस्थिती नियंत्रणात आणायला हवी, असेही ते म्हणाले.
 
@@AUTHORINFO_V1@@