पावसामुळे मुंबईचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2018
Total Views |

रेल्वे सेवा विस्कळीत 

डबेवाल्यांची सेवा देखील आज बंद




 
मुंबई : मुंबई महानगरामध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शहरामध्ये ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे शहरातील रेल्वे सेवा आणि पायाभूत सुविधा देखील पूर्णपणे कोलमडून पडल्याअसून मुंबईतील डबेवाल्यांची सेवा देखील आजच्या दिवस बंद राहणार आहे.

शहरातील रेल्वे मार्गांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील सर्व लोकल सेवा या मंदावल्या आहेत. तसेच विरार-बोरीवली येथील रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प पडली असून यामुळे सामान्य मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान शहरामध्ये सर्वत्र गुडघाभर पाणी जमा झाले असल्यामुळे शहरातून होणाऱ्या वाहतुकीला देखील यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.


मुंबईबरोबरच कोकणामध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यामध्ये देखील आज सकाळपासून पावसाची उघडझाप सुरु असून विदर्भात मात्र पावसाने आपली दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे यवतमाळमधील आडना नदीला पूर आला असून नदीकिनारी असेल्या पुरडे या गावातील नागरिक पुरामध्ये अडकले आहे. दरम्यान स्थानिक प्रशासनाकडून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@